
Dr tanu jain Success Story: उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील डॉ. तनु जैन यांनी आपल्या दृढनिश्चय, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यूपीएससीसारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवून एक आदर्श निर्माण केला. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि आज त्या लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय सेल्फ स्टडीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता त्या तरुणांना या आव्हानात्मक प्रवासासाठी मार्गदर्शन करत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रापासून यूपीएससीपर्यंतचा प्रवास कसा होता?
डॉ. तनु जैन यांनी दंत शस्त्रक्रिया (बीडीएस) ही प्रतिष्ठित व्यावसायिक पदवी प्राप्त केली. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी त्यांनी देशसेवेचा मार्ग निवडला. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना त्यांनी कोणत्याही कोचिंग संस्थेची मदत न घेता स्वतःच्या अभ्यासावर भर दिला. या कठीण प्रवासात त्यांनी 2015 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून अखिल भारतीय 648 वा क्रमांक मिळवला. त्यांची सशस्त्र दल मुख्यालय सेवा (AFHQ) कॅडरमध्ये निवड झाली, जिथे त्यांनी काही काळ नागरी सेवक म्हणून सेवा बजावली.
All the very best to every UPSC warrior appearing for the Prelims!
Believe in your hard work, trust your journey, and let your calm mind guide you tomorrow.#CivilServicesExam #UPSCJourney #IASDream #UPSC2025 #Prelims2025 #upscaspirants pic.twitter.com/m3GjFV0bxb— Dr.Tanu Jain (@DrTanuJain1) May 24, 2025
पाया मजबूत कसा केला?
डॉ. तनु यांचा यूपीएससीचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता. हिंदी माध्यमातून शिकत असताना इंग्रजी विषय समजून घेणे, नवीन विषयांचा अभ्यास करणे आणि वेळेचे व्यवस्थापन करणे यासारख्या अडचणींना त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांनी यूपीएससी अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार रणनीती आखली. सहावी ते बारावीच्या एनसीईआरटी पुस्तकांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपला पाया मजबूत केला.
कसा केला अभ्यास?
याशिवाय दररोज वर्तमानपत्रे, चालू घडामोडींच्या पीडीएफ, पीआयबी आणि राज्यसभा टीव्हीच्या माध्यमातून त्या अपडेट राहिल्या. उत्तरलेखनाचा सराव हा त्यांच्या तयारीचा महत्त्वाचा भाग होता. त्या दररोज 1-2 उत्तरे लिहायच्या आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून आपली लेखनशैली सुधारायच्या. चाचणी मालिकेत सहभागी होऊन त्यांनी आपले वेळ व्यवस्थापन आणि उत्तरांची गुणवत्ता वाढवली. या सर्व मेहनतीमुळे त्यांनी यूपीएससीच्या कठीण टप्प्यांना यशस्वीपणे पार केले.
नोकरी सोडून तरुणांना मार्गदर्शनाची वाट
नागरी सेवेत काही काळ काम केल्यानंतर डॉ. तनु जैन यांनी सरकारी नोकरी सोडून तरुणांना प्रेरणा देण्याचा आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या दृष्टी आयएएस येथे प्रेरक वक्ता, मुलाखत पॅनेल सदस्य आणि शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यूट्यूब आणि इतर डिजिटल व्यासपीठांद्वारे त्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. यूपीएससी तयारीसाठी सेमिनार, मुलाखत मार्गदर्शन आणि प्रेरणादायी सत्रांद्वारे त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. ‘जर तुमचे ध्येय स्पष्ट असेल आणि मनात समर्पण असेल, तर कोणताही मार्ग अशक्य नाही’, से त्या सांगतात. त्यांचा हा विश्वास त्यांच्या कार्यातून आणि विद्यार्थ्यांशी संवादातूनही स्पष्टपणे दिसतो.
प्रेरणादायी प्रवास
ज्यांना प्रतिकूल परिस्थितीतही आपली स्वप्ने साकार करण्याची जिद्द आहे, अशा सर्वांसाठी डॉ. तनु जैन यांची कहाणी अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. वैद्यकीय क्षेत्रातून प्रशासकीय सेवेपर्यंत आणि नंतर तरुणांना मार्गदर्शन करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास योग्य दिशा, उद्देश आणि मेहनत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे शिकवतो.
तरुणांना काय मिळते प्रेरणा?
पार्श्वभूमी कोणतीही असो, दृढनिश्चयाने यश निश्चित मिळते, हे डॉ. तनु जैन यांनी सिद्ध केलंय. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणांना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देतो. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी यूपीएससीच्या तयारीत यश मिळवण्यासाठी पुढे सरसावत असल्याचेही दिसून येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.