digital products downloads

Success Story: मजामस्करीत सुरु केलं काम, आज मेघना करतेय लाखोंची कमाई, कोट्यवधीचा टर्नओव्हर!

Success Story: मजामस्करीत सुरु केलं काम, आज मेघना करतेय लाखोंची कमाई, कोट्यवधीचा टर्नओव्हर!

Megna Jain Success Story: तुमचा एखादा छंद तुमची आवड बनला तर यश आपोआप तुमच्याकडे येते, असं म्हणतात. बेंगळुरूच्या मेघना जैनसोबतही असेच काहीसे घडले. मेघना वर्षानुवर्षे फक्त मजा आणि छंद म्हणून काम करत होती. पण आज ती व्यवसाय करोडोंची उलाढाल करत आहे.

2011 मध्ये मेघनाने तिच्या शेजाऱ्याकडून कपकेक बनवायला शिकली. तिला बेकिंगची आवड निर्माण झाली आणि दर रविवारी ती घरी कपकेक बनवू लागली आणि कॉलेजच्या कॅफेटेरियामध्ये ते विकू लागली. त्यावेळी आपल्याला किती फायदा होईल? हे तिला माहिती नव्हते. किंवा तिच्या डोक्यात ब्रँड तयार करण्याचीही कोणतीही योजना नव्हती. पण आज मेघनाच्या स्टार्टअप ड्रीम ए डझनची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कशी झाली सुरुवात?

मेघनाच्या स्टार्टअपला तिचा परिवार आणि मित्रमैत्रिणींकडून खूप सहकार्य मिळाले. यानंतर मेघनाने एनआयटीच्या एका व्यवसाय स्पर्धेत सहभाग घेतला. यात तिला तिसरे स्थान मिळाले. ही स्पर्धा मेघनाच्या स्टार्टअपसाठी एक गेम चेंजर ठरली. तिला इंडियन एंजेल नेटवर्क्स सारख्या कंपन्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यामुळे मेघनाचा आत्मविश्वासही वाढला. 

कॉलेज पूर्ण होईपर्यंत मेघना कपकेक विकून दरमहा 7-8 हजार रुपये कमवू लागली. यानंतर तिने फूड इंडस्ट्रीत काम केले आणि अनेक फूड टेक्नोलॉजी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभवही मिळवला.

2018 मध्ये स्टार्टअप सुरू

काही वर्षांच्या तयारी आणि अनुभवानंतर मेघनाने 2018 मध्ये ड्रीम ए डझन नावाचा तिचा स्टार्टअप सुरू केला. सुरुवातीला ती उन्हाळी कार्यशाळांमध्ये लोकांना बेकिंग शिकवत असे. मग हळूहळू तिने कॉर्पोरेट हॅम्पर्स तयार करायला सुरुवात केली. ज्यामुळे तिची ओळख वाढली. पर्यायाने तिच्याकडे कपकेकची मागणीही वाढली.

 वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांच्या पुढे

2020 मध्ये कोरोना महामारीमुळे जगभरात नुकसान झाले. याचा मेघनाच्या स्टार्टअपवरही खूप परिणाम झाला. पण मेघनाने हार मानली नाही. तिने ऑनलाइन ऑर्डर, कार्यशाळा आणि ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित केले आणि हळूहळू स्टार्टअप पुन्हा रुळावर आणला. आज ‘ड्रीम अ डझन’ हा केवळ बेंगळुरूमध्येच नव्हे तर देशभरात एक लोकप्रिय बेकरी ब्रँड बनला. मेघनाची वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp