
Gopichand Padalkar: भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालाय. जयंत पाटलांनी मंत्री असताना अनेकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत केलाय. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून अनेकदा हिणवले जाते, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं ते सांग, असे गोपीचंद पडळकर जाहीर सभेत म्हणाले होते. आमच्या गावाकडे एखाद्याच्या 2-3 लग्न झालीयत. त्यामुळे मी असं बोलल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. पण हा ‘मंगळसूत्र चोर’ वाद नेमका कुठून सुरु झाला? यावर गोपीचंद पडळकर सविस्तर बोलले आहेत.
‘तिथून माझ्यावर केसेस पडायला सुरुवात’
2009 ला मी विधानसभेची पहिली निवडणूक लढवत होतो. तेव्हा स्वर्गीय अनिल बाबर आणि 17 उमेदवार इच्छुक उमेदवार होते. तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले आणि बाबर उभे राहिले. तो मतदारसंघ कॉंग्रेसकडे गेला. मी नवीन पोरगा होता. मला 19 हजार 950 मतं पडली. निवडून येणारे अनिल तिथून पडले.तेव्हा त्यांचे मानस बंधू आर आर पाटील गृहमंत्री होते. तिथून माझ्यावर केसेस पडायला सुरुवात झाली.
‘लग्नात वाद झाला आणि…’
कसून येथे तेव्हा लग्न होतं. लग्नाच्या पत्रिकेत मी प्रमुख पाहुणा होतो. मी तांदूळ पडताना तिथे नव्हतो. 15-20 लग्न आटपून मी तिथे पोहोचलो. तिथे एक वाद झाला. मी तिथे तासाभरात पोहोचलो. त्याची तक्रार आटपाडी पोलीस स्टेशनला गेली. तिथे गोपीचंद पडळकर यांनी मंगळसूत्र चोरलं अशी तक्रार त्यांनी केले.
‘सत्तेचा वापर करुन खोटे गुन्हे’
आर.आर.पाटील होते तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली. पण त्यांच्या मृत्यूनंतर मी कधीच बोललो नाही. प्रस्थापित पोलीस, तलाठी, ग्रामसेवक यांचा वापर करतात. प्रशासनाचा गैरवापर करुन छोट्या लोकांवर खोटे गुन्हे टाकायचे. तुम्ही काहीही केलं तरी आम्ही आमची भूमिका सोडलेली नाही. आम्ही आमची बाजू सोडलेली नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
FAQ
प्रश्न: ‘मंगळसूत्र चोर’ वादाचा नेमका उगम काय आहे आणि तो कधी सुरू झाला?
उत्तर: हा वाद २००८-२००९ च्या सुमारास सुरू झाला, जेव्हा पडळकर आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत (२००९) लढत होते. कसून येथे एका लग्न समारंभात पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. १५-२० लग्न आटोपून ते तिथे पोहोचले, तेव्हा विरोधी कार्यकर्त्यांशी वाद झाला आणि धक्काबुक्की झाली. यात काही महिलांच्या मंगळसूत्राबाबत तक्रार करून आटपाडी पोलीस स्टेशनात ‘मंगळसूत्र चोरी’चा गुन्हा दाखल करण्यात आला. पडळकरांच्या मते, ते प्रत्यक्ष तिथे नव्हते आणि हा राजकीय वैमनस्यातून केलेला खोटा आरोप आहे.
प्रश्न: या वादामुळे पडळकरांवर कोणत्या प्रकारचे केसेस झाले आणि त्यामागे काय कारण होते?
उत्तर: २००९ च्या निवडणुकीत पडळकरांना १९,९५० मते मिळाली, पण ते हरले. यानंतर स्वर्गीय अनिल बाबर यांचे मानस बंधू आणि तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या काळात पडळकरांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली. प्रस्थापित प्रशासन (पोलीस, तलाठी, ग्रामसेवक) वापरून छोट्या लोकांवर सत्तेचा गैरवापर करून केसेस टाकल्या जात होत्या. पडळकरांनी आर.आर. पाटील यांच्यावर टीका केली होती, पण त्यांच्या मृत्यूनंतर कधीच बोलले नाहीत.
प्रश्न: पडळकरांनी ‘मंगळसूत्र चोर’ या टोमण्याला कसे प्रत्युत्तर दिले?
उत्तर: पडळकरांनी जाहीर सभेत म्हटले, “मला मंगळसूत्र चोर म्हणतात, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, ते सांग?” हे गावाकडील परंपरेनुसार २-३ लग्न असणाऱ्यांना उद्देशून होते. मुलाखतीत ते म्हणाले की, हा वाद राजकीय आहे आणि ते कधीच भूमिका सोडली नाही. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यावर जमीन हडपण्याचे आरोप करताना हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



