
Uddhav-Raj Thackery : महाराष्ट्र राजकारणातील दोन वाघ तब्बल 20 वर्षांनी एका मुद्दावरुन एकाच मंचावर येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शनिवारी 5 जुलैला वरळी डोम या सभागृहात मराठी विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र दिसणार आहे. यावेळी ते महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्रातील राजकारणाला काय वळण देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या 6 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहिला मिळाल्यात. ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केली नाही अशा गोष्टी राज्यातील जनतेला पाहिला मिळाल्यात. शिवसेनेनं काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत नवी राजकीय पक्ष, शिवसेनेत उभी फूट अशा अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत. पण हे महाराष्ट्रातील शक्तीशाली नेते आणि ठाकरे बंधू 2005 मध्ये वेगळे का झाले. नेमकं तेव्हा काय घडलं होतं, जाणून घेऊयात.
2005 मध्ये नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची घोडदौड चालवत होते. त्या काळात राजकीय तज्ज्ञ म्हणत होते बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार हे राज ठाकरे होणिार. पण 2003 मध्ये अचानक एक ट्विस्ट आला. महाबळेश्वरला शिवसेनेचं अधिवेशनात अचानक बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं. या घोषणेनंतर शिवसेनेत आणि सामान्य शिवसैनिकांमध्ये कुचबुच सुरु झाली. हीच ती वेळ होती जेव्हा शिवसेनेत पहिली ठिणगी पडली. या घोषणेनंतर राज ठाकरे आणि त्यांचं समर्थक शिवसेनेतून बाजूला झाल्याच त्यांना जाणवायला लागलं. शिवसेनेसोबत राजकीय ताण वाढत असताना राज ठाकरेंनी मोठा भूकंप केला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
तो दिवस होता 18 डिसेंबर 2005… 36 वर्षीय राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क जिमखान्यात पत्रकार परिषदेत भावनेने दबलेल्या आवाजात म्हटलं. माझ्या सर्वात वाईट शत्रूवरही मी आजच्यासारखा दिवस येऊ देणार नाही. मी फक्त आदर मागितला होता. मला फक्त अपमान आणि अपमान मिळाला. मी अत्यंत आदरानं सगळ्या गोष्टी केल्या पण मला जे मिळालं ते अत्यंत अपमानास्पद आणि छळणारं आहे. माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे. त्यासोबत त्यांनी बाळसाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मातोश्रीतून बाहेर पडत राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी पुढील तीन महिन्यांत राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापना केली.
उद्धव ठाकरे तेव्हा काय म्हणालेत?
मुंबईतील वांद्रेमधील ठाकरे निवासस्थान असलेल्या मातोश्री इथे दुसरी पत्रकार परिषद झाली. राज ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि बाळसाहेब ठाकरे यांचं पुत्र उद्धव, जे त्यावेळी 44 वर्षांचे होते त्यांनी आपल्या मनातील विचार मांडले. ते म्हणाले की, ‘राज यांचा निर्णय हा गैरसमजाचा परिणाम आहे. त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी बंड केलं आणि इतकं दिवस आम्हाला आशा होती की मतभेद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवलं जातील. पण 15 डिसेंबर रोजी बाळसाहेब ठाकरेंना भेटल्यानंतरही ते ठाम राहिले.’ बाळसाहेब ठाकरेंना त्यांच्या पुतण्यांच्या निर्णयामुळे दुःख झालं असल्याचं उद्धव म्हणाले. पण फायरब्रँड सेना प्रमुखांनी माध्यमांशी काहीही बोलले नाही.
त्या विभक्ततेच्या वीस वर्षांनंतर, दोन वेगळे झालेले चुलत भाऊ, राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचे व्यापक संकेत दिले आहेत, या घडामोडीमुळे महाराष्ट्र आणि देशभरातील राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील राजकारणात कोणता भूकंप करणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.