
Shivram Patil met Anna Hazare: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपुर्वी ‘वोट चोरी’ नावाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर ‘वोट चोरी’ हा मुद्दा देशभरात चर्चेला आला. यानंतर ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना या मुद्द्यावर आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली होती. पुण्यात यासंदर्भातील बॅनर लागले होते. यानंतर आण्णांनीदेखील आता तरुणांनी पुढे यायला हवं, असे आवाहन केले. दरम्यान समाजसेवक शिवराम पाटील यांनी थेट राळेगणसिद्धी गाठली आणि अण्णांच्या डोळायात डोळे टाकून ‘वोट चोर’ या विषयासंदर्भात आण्णा हजारेंना माहिती दिली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन ‘वोट चोरी’ संदर्भातील गंभीर मुद्दा उपस्थित केला. या भेटीत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची माहिती दिली आणि अण्णा हजारे यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले शिवराम पाटील?
देशातील निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरी झाली. ही हेराफेरी राहुल गांधी यांनी शोधून काढली. याचा डॉक्यूमेंट्री पुरावा कोर्टात दिला. एका घरात 50 घरे दाखवली. म्हणून राहुल गांधींचे आंदोलन चांगले आहे. आण्णांनी त्यावेळी आरएसएसला साथ दिली. आतादेखील अण्णांनी साथ द्यायला हवी, असे लोक म्हणत असल्याचे शिवराम पाटलांनी आण्णांना सांगितले.
लोकशाही वाचवणे हा आपला मूळ होतू आहे. त्यामुळे तो भाजप, सेना की कॉंग्रेसवाला आहे? असा फरक करायचा नाही. आण्णा तुम्ही शांत झोपलेयत असं लोकं म्हणतात. आमचं असं म्हणणं आहे आमचे आण्णा आंदोलन करायला आजही तयार आहेत फक्त परिस्थिती खराब आहे. वय झालंय. आम्हाला तुमच्याकडून आशा आहे. तुम्ही आमचे पितामह आहात. तुमच्यामुळे आमचं स्वातंत्र्य अबाधित राहीलं, आहे, असे शिवराम पाटील आण्णा हजारेंना म्हणाले.
बॅनरमुळे झाले होते नाराज
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उद्देशून पुण्यातील पाषाण परिसरात बॅनर लागले आहेत. ‘आता तरी उठा, मत चोरी झालेली आहे’ असं त्यावर लिहिलं आहे. या पार्श्वभूमीवर देशावर संकट आले असून अण्णांची गरज असल्याचे बॅनर पुण्यात लागले. या बॅनरची खूप चर्चा झाल्यानंतर अण्णा हजारेंनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.फोटो असलेले फ्लेक्सबोर्ड लागल्यानंतर अण्णा हजारेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या फ्लेक्सबोर्डद्वारे त्यांना टोमणे मारण्यात आल्याचा उल्लेख आहे. अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया देताना तरुणांना देशाप्रती कर्तव्याची जाणीव करून दिली. अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, ‘मी दहा कायदे आणले, पण 90 वर्षांनंतरही मीच सर्वकाही करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं, ही अपेक्षा चुकीची आहे. मी जे केलं, ते तरुणांनी पुढे करावं, अशी माझी इच्छा आहे’, असे अण्णा हजारे म्हणाले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी चळवळी, माहितीचा अधिकार, जनलोकपाल विधेयक आणि राळेगण सिद्धी गावाच्या विकासाद्वारे देशभरात सामाजिक बदल घडवले. त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, फक्त स्वातंत्र्यदिनी तिरंगा हातात घेऊन उत्सव साजरा करणे पुरेसे नाही. “देशाचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. बोट दाखवून काहीही साध्य होणार नाही,” असेही ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.