
School charged Heavy Fees: अनेक शालेय मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत. तर काहींच्या शाळांमध्ये पुढच्या वर्गाला सुरुवातदेखील झालीय. नवीन वर्ष म्हंटलं की विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्साह असतो. बॅग, वह्या-पुस्तकं सर्वकाही नवीन घेण्याचा प्रयत्न असतो. पण या सर्वाचा आता व्यवसाय झालाय का? असा प्रश्न उभा राहतो. कारण शाळांकडून पालकांच्या भावनेचा वापर पैसा कमावण्यासाठी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
आजच्या काळात शिक्षण आणि आरोग्य इतके महाग झाले आहेत की त्याची किंमत मोजण्यापूर्वी लोकांना 10 वेळा विचार करावा लागतो. एका कष्टकरी व्यक्तीचे संपूर्ण उत्पन्न त्याच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च होतंय. ज्यांचे उत्पन्न कमी आहे ते या युगात मुलांना शिक्षण देण्याचा विचारही करू शकत नाहीत. खासगी शाळांची फी लाखो रुपयांपेक्षा जास्त आहे. फी व्यतिरिक्त मुलांची पुस्तके आणि सर्व प्रकारचे कपडेदेखील इतके महाग आहेत की जर ते खरेदी केले तर मासिक बजेटवर परिणाम होतो.
खासगी शाळा मध्यमवर्गाचे रक्त शोषतायत?
प्राइवेट स्कूल किताबों का दाम बढाकर कैसे मिडिल क्लास पेरेंट्स का दिवाला निकाल रहें हैँ.
इस वीडियो में किये गए व्यंग्य से समझो.. pic.twitter.com/9qKP8FnK0b— BITTU SHARMA- ا (@common000786Om) April 3, 2025
वाढत्या महागाईसोबतच शाळांमधील लूटमारीमुळे पालकांवरील बोजा चौपट वाढल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे मध्यमवर्गावर आधीच आर्थिक ताण आलाय आणि आता शाळांनीही त्यांचे रक्त शोषण्यास सुरुवात केलीय. मुलांसाठी महागड्या शालेय पुस्तकांच्या किमती ऐकून पालक हैराण होत आहेत. अलिकडेच या प्रकाराचा धक्का घेतलेल्या एका पालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका पालकाने मुलांच्या महागड्या शिक्षणावर आणि खासगी शाळांकडून होणाऱ्या लूटमारीवर टीका केली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये संतप्त पालक शाळांवर टीका करतोय आणि त्यांच्यावर जास्त किमतीत पुस्तके विकल्याचा आरोप करतोय.
पाचवीच्या मुलासाठी शालेय पुस्तकांची किंमत सुमारे 7 हजार रुपये
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पालक म्हणतात की, ‘आज मी पाचवीच्या मुलासाठी एक पुस्तक आणले आहे. या पुस्तकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकांचे मुखपृष्ठ चांदीचे आहे. असे म्हणून ते पुस्तकाच्या मुखपृष्ठाला स्पर्श करतात आणि म्हणतात, ‘बरं, जर ही पुस्तके चांदीची नसतील, तर या पुस्तकांमधील चित्रे चांदीच्या फॉइलने झाकली असावीत.’ यानंतर पुस्तकाच्या चित्रांमध्ये चांदीचे वर्क सापडले नाही, तेव्हा ते पालक म्हणतात, ‘हे एक जादूचे पुस्तक आहे. मुले त्याला स्पर्श करताच पुस्तकातील सर्व माहिती आपोआप त्यांच्या मनात साठवली जाते.’ यानंतर ती व्यक्ती कॅमेऱ्यासमोर प्रश्न विचारते की जर असे नसेल तर या पुस्तकांची किंमत 6 हजार 905 रुपये का आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न
यानंतर त्या पालकांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. ‘जेव्हा नवीन शिक्षण धोरणामध्ये ‘एक देश, एक वर्ग, एक अभ्यासक्रम आणि एक प्रकाशन’ बद्दल बोलले जाते तेव्हा या खासगी शाळा अजूनही इतक्या महागड्या पुस्तके का विकत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या शाळा केवळ मुलांच्या दप्तरांवरचाच भार वाढवत नाहीत तर पालकांच्या खिशावरही भार टाकत आहेत. या खासगी शाळा पुस्तकांच्या किमती वाढवून मध्यमवर्गीय पालकांना दिवाळखोरीत काढतायत’, असा आरोप त्यांनी केलाय.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
संबंधित पालकाचा हा व्हायरल व्हिडिओ बिट्टू शर्मा नावाच्या यूजरने त्याच्या @common000786Om या अकाउंटवरून सोशल साइटवर शेअर केलाय. लाखो लोकांनी हा व्हि़डीओ पाहिलाय आणि हजारो लोकांनी त्याला लाईक केलंय. व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, ‘साहेब, तुम्ही मला लुटत आहात. मला शिक्षणावर लाखो रुपये खर्च करावे लागतील.’ दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, ‘मी माझ्या मुलासाठी पुस्तके खरेदी करायला गेलो होतो आणि त्यांची किंमत ऐकून मी थक्क झालोय. माझ्या संपूर्ण शिक्षणावर मी खर्च केलेली रक्कम त्यांच्या एका वर्षाच्या खर्चासाठी पुरेशी आहे.’ तिसऱ्याने लिहिले, ‘आमच्या काळात आयुष्यभराचा अभ्यास एका बाजूला असतो आणि आता या शाळांची फी दुसऱ्या बाजूला असते.’
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.