digital products downloads

VSR विमान कंपनीत महिला पायलट, क्रूसोबत गैरवर्तन, रोहित पवारांचे खळबळजनक आरोप!

VSR विमान कंपनीत महिला पायलट, क्रूसोबत गैरवर्तन, रोहित पवारांचे खळबळजनक आरोप!

Rohit Pawars sensational allegations: अजित पवार विमान अपघात प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेयत. राजधानी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर संशय व्यक्त केलाय. VSR कंपनीच्या मालकांशी राम नायडू यांचे संबंध असल्याचा दावा रोहित पवार यांनी या अगोदरच केले होते.टीडीपी किंवा मंत्री राममोहन नायडू यांचा व्हीएसआर कंपनीशी कोणताही संबंध नाही असं या अगोदर नायडू यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान रोहित पवार यांनी काय आरोप केलेयत? सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

सुरक्षेचा विषय असल्याने पायलटचा ग्रुप एकत्र राजीनामा देणार होते. पण त्यांना धमकी देण्यात आली. कॅप्टन व्ही के सिंग यांना एक तक्रार आली होती. त्यावर काही ठोस झाले नाही. विमान चालवत होते की व्हिडीओ गेम? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

दिल्लीचा प्रसिद्ध क्रिकेटर विमानात बसला होता तेव्हा विमान इंजिनमध्ये गडबड झाली होती. त्याने व्हीएसआरमध्ये बसायचं बंद केलं. व्हीएसआर तरीही सुरु आहे. कार्लोस नावाचा व्यक्ती विमान चालवतो. या सर्व गोंधळामागे कोणाचा हात आहे हेदेखील सांगणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

पेपर वर्क करताय?, व्हीएसआरला वाचवतायत की जाणूनबुजून वेळ लावला जातोय? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. ब्लॅक बॉक्स शोधायला 2 दिवस लागले. बारामतीतून न्यायला 4 दिवस लागले. आतले अधिकारीच सामील असल्याचा संशय आम्हाला असल्याचे रोहित पवार म्हणाले. श्वेता सिंग महाराष्ट्रातील पॉवरफूल व्यक्तीमत्व आहे. आपल्यावर काही कारवाई होणार नसल्याचे त्या खासगीत सांगतात, असेही पवार म्हणाले.

एव्हीएशन कंपनी व्हीएसआरला वाचवतेय का ?

28 तारखेले एव्हीएशन मिनिस्टरने प्रतिक्रिया दिली होती. इथे कोणती अडचण नाही. नो सेफ्टी कन्सर्न असेल असे त्यांनी म्हटले होते. आम्ही आरोप केल्यानंतर व्हीएसआरशी संबंध नसल्याचे ते म्हणाले होते. 

VSR कंपनी संदर्भात अनेक गंभीर मुद्दे रोहित पवार यांनी समोर आणले आहे. या कंपनीत महिला पायलट आणि महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन झाले. महिला पायलट तसेच महिला कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारी समोर आल्याचा आरोप आहे. खर्च वाचवण्यासाठी कॅबिन क्रूला पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. काहीवेळा प्रवाशांनाच कॅबिन क्रू म्हणून दाखवून त्यांच्याकडून कॅबिन क्रूची कामे करून घेतली जात होती, असा आरोप करण्यात आला आहे.

कॅप्टन कार्लोस (व्हेनेझुएला) प्रकरण

त्यांचा परवाना कालबाह्य झाल्यानंतरही त्यांना विमानात प्रवासी म्हणून बसवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून पायलट म्हणून विमान उडवून घेण्यात आले, असा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात उदयपूरमधील एका व्यावसायिकाचे विमान आणि कार्लोस यांचा संबंध असल्याचे म्हटले जात आहे. प्रवासी यादी (Passenger Manifest) संदर्भातील अनियमितताप्रवाशांच्या अधिकृत यादीत त्रुटी आणि विसंगती असल्याचा आरोप आहे. सर्व फ्लाइट प्लॅनमध्ये हवामान अहवाल एकाच व्यक्तीकडून भरला जात होता, अशी माहिती समोर आली आहे. तसेच पायलट लॉग बुक आणि इंजिन लॉग बुक व्यवस्थित उपलब्ध नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. काही उड्डाणांसाठी अधिकृत फ्लाइट प्लॅन उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. उड्डाणासाठी अत्यावश्यक असलेला जॅपेसन चार्ट उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
या सर्व आरोपांमुळे कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीवर आणि सुरक्षिततेच्या निकषांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp