
मे महिना हा नागरिकांसाठी एक वेगळाच हवामानाचा अनुभव घेऊन येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अलर्ट जाहीर केला आहे. एवढंच नव्हे वातावरणात मोठा बदल पाहता येणार आहेत. हवामान खात्याने 19 राज्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानात धुळीचे वादळ येऊ शकते. शनिवारी नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली. भंडारा जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस झाला. दुसरीकडे गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांतही वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला.
राजस्थानाच्या वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम
नैलृत्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून 900 मीटवर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. याचा परिणाम गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण तामिळनाडूवर झाला आहे. यामुळे या ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात उन्हाचा चटक्यासह उकाड्यात वाढ झाली असून येत्या काळात उष्ण आणि दमट अस वातावरण असणार आहे.
अतिउष्णतेमुळे डोकेदुखी वाढली
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढले असून, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत. त्यासोबत काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होत आहे. विषाणूच्या संसर्गाचे रुग्णसुद्धा वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईत उष्माघाताचे रुग्ण अद्याप सापडले नसले, तरी अति उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर इतर परिणाम होताना दिसून येत आहेत. महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणे, उन्हात फिरणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा वातावरणात काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उष्माघाताचा त्रासावर उपाय
पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात, सावलीत आणावे.
थंड पाण्याच्या पट्ट्यांचा वापर करावा. सैल कपडे वापरावेत.
उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
उष्माघातासारखे वाटल्यास जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संसर्गामुळे घसा दुखी, सर्दीचा त्रास
तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, चक्कर येणे, मळमळ होणे या आजारांचा सामना करावा लागतो. विषाणूच्या संसर्गामुळे घसादुखीच्या तक्रारी निदर्शनास येत आहेत. डोकेदुखी होत असल्याचे रुग्ण रुग्णालयात येत आहेत. त्यावेळी त्यांना लक्षणे बघून त्यावर उपचार केले पाहिजेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.