
Maharashtra Weather Update : केंद्रीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अर्थात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काख्मीरच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पावसासोबतच इथं किमान तापमानातही घट होणार असल्याचा इशारा जारी करण्याक आला आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय असल्या कारणानं त्याचा थेट परिणाम हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये दिसून येणार आहे. तर उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी, चमोली, रुद्र प्रयाग, पिथौरागढमधील काही भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील या वातावरणाचा महाराष्ट्रात मात्र फारसा परिणाम दिसून येत नाहीये.
दिवाळीत थंडी गायब, आणखी किती दिवस सोसावा लागणार उकाडा?
सहसा दिवाळीदरम्यान पहाटे गारठा प़डण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तरेकडे थंडीचे दिवस सुरू झाले असले तरीही महाराष्ट्रापर्यंत अद्याप या शीतलहरी पोहोचल्या नसल्यानं नागरिकांना उकाडा सोसावा लागत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राज्यातील कमाल तापमानाचा आकडा 35.9 अंश इतका नोंदवण्यात आला. तर, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार जेव्हा कमाल तापमानाचा आकडा 32 अंशांहून कमी असेल आणि किमान तापमान 20 अंशांहून कमी असेल तेव्हाच राज्यात खऱ्या अर्थानं हिवाळा सुरू झाला असं म्हणावं लागेत. ऑक्टोबरमध्येतरी तशी अपेक्षा नसल्यानं आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं उष्णतेचा दाह मात्र अधिक भासत आहे.
राज्यात प्रामुख्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळ ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी तापमानाचा आकडा प्रचंड वाढत असल्या कारणानं नागरिकांना उष्माघातसम परिणामांचा सामनाही करावा लागू शकतो. ज्यामुळं यंत्रणांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील दमट हवामानात वाढ झाली असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती इथं विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हवा कोरडी असेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
आयएमडीच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा दक्षिण किनारपट्टी भाग यासह अंदमानचा समुद्र आणि नजीकच्या समुद्री भागावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं त्याचे कमीजास्त स्वरुपातील परिणाम राज्यातील हवामानावर दिसून येऊ शकतात असा प्राथमिक अंदाज वर्तवत आता राज्यात हिवाळ्याची चाहूल केव्हा लागते याचीच प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
FAQ
उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाचा आणि थंडीचा इशारा आहे का?
होय, केंद्रीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये पुढील 24 तासांत पावसाचा अंदाज आहे. पावसासोबत किमान तापमानात घट होईल, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.
महाराष्ट्रात या उत्तरेकडील हवामानाचा परिणाम होत आहे का?
नाही, महाराष्ट्रात उत्तरेकडील या वातावरणाचा फारसा परिणाम दिसत नाही. राज्यात उकाडा कायम आहे, आणि हिवाळ्याची चाहूल अद्याप लागलेली नाही.
महाराष्ट्रात पावसाचा किंवा वादळी हवामानाचा इशारा आहे का?
होय, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर; मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड; विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती येथे विजांसह पावसाची शक्यता आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.