
अखेर ZEE 24 TAAS च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी दिली शेतकरी अंबादास पवार यांना मदत… माझ्या वाट्याची मदत मी केली, आता तुम्ही कधी करणार ? असं म्हणत सोनू सूद यांचा ट्रोल करणाऱ्यांना थेट सवाल? आर्थिक मदतीचं बँक स्टेटमेंट केलं शेअर..
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावातील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी बैलजोडी परवडत नसल्यामुळे स्वतःलाच औताला जुंपून शेतीची मशागत केली. झी २४ तासने ही धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी सर्वप्रथम उचलून धरली, आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या वृद्ध शेतकऱ्याच्या संघर्षाची दखल घेतली गेली. रिअल लाईफ हिरो म्हणून ओळखले जाणारे अभिनेता सोनू सूद यांनी त्यांच्यासाठी बैलजोडी देण्याचं आश्वासन दिलं होतं.
मेरे हिस्से की मदद तो मैंने पहले ही हमारे किसान अंबादास भाई की कर दी थी।
अब अपने हिस्से की घास आप भी भेज देना
क्या है ना भाई, ट्विटर पे ज़हर फैलाने से देश नहीं चलेगा। किसी और को मदद पहुँचाना हो तो मेसेज कर देना
जय हिन्द https://t.co/E3jsMP0w3X pic.twitter.com/WxMd0IxjjW— sonu sood (@SonuSood) July 7, 2025
मात्र काही दिवसांनी सोशल मीडियावर काही नेटकर्यांकडून सोनू सूद यांच्यावर टीका झाली. “केवळ प्रसिद्धीसाठी घोषणा करतात, पण प्रत्यक्षात मदत करतात का? असा सवाल विचारण्यात आला.यावर सोनू सूद यांनी नेटकर्यांना थेट उत्तर देताना शेतकरी अंबादास पवार यांच्या बँक खात्यात ४५ हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याचं स्टेटमेंट ट्विटरवर शेअर केलं. त्यासोबतच त्यांनी ट्वीट करत म्हटलं – माझ्या वाट्याची मदत तर मी आधीच केली आहे, आता तुम्ही तुमच्या वाट्याची मदतही करा. कारण ट्विटरवर विष पसरवून देश चालत नाही. असं त्यांनी ट्विट केलं.
ZEE 24 TAAS च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला. आज अंबादास पवार यांचा संघर्ष उमेद आणि मदतीच्या प्रकाशात झळकू लागला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.