
Zomato layoffs: ऑनलाइन फूड आणि किराणा मालाची डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटोने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना धक्का दिलाय. कंपनीतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. झोमॅटो कंपनीचा फूड डिलीव्हरी व्यवसाय वाढताना दिसतोय. असे असताना दुसरीकडे त्यांची उपकंपनी क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिट सतत तोट्यात दिसतोय.
झोमॅटो कंपनीने त्यांच्या 600 हून अधिक ग्राहक सेवा अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. या कर्मचाऱ्यांना कंपनीने 1 वर्षापुर्वीच नोकरीवर ठेवले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. मनीकंट्रोलने यासंदर्भात वृत्त दिलंय.
कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढले
झोमॅटो असोसिएट अॅक्सिलरेटर प्रोग्राम (ZAAP) अंतर्गत कंपनीत 1500 कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हची भरती करण्यात आली होती. कंपनीत एक वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्याला प्रमोशन मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना लागली होती. पण कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. कंपनीने कपातीची घोषणा केल्यावर कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यापैकी बहुतेक कर्मचाऱ्यांचे करार नुतनीकरण झाले नाही. त्यांना कोणतीही सूचना न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
कर्मचाऱ्यांना काढताना काय दिलं कारण?
झोमॅटो कंपनीने 600 कर्मचाऱ्यांच्या कपातीची कारणे दिली आहेत. खराब कामगिरी,शिस्त नसणे, कस्टमर सपोर्टमध्ये एआयचा वाढता वापर आणि खर्चात कपात ही कारणे कंपनीच्यावतीने सांगण्यात आली आहेत.
एआयचा मोठ्या प्रमाणात वापर
आजकाल कंपनी कस्टमर सपोर्ट सर्व्हिसला स्वयंचलित करण्यावर लक्ष केंद्रित करतेय. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर वेगाने केला जातोय. अलीकडेच कंपनीने नगेट नावाचा एआय-जनरेटेड कस्टमर सपोर्ट प्लॅटफॉर्म लाँच केलाय. यामाध्यमातून दर महिन्याला 1.5 कोटी ग्राहकांशी संवाद साधला जातो. कंपनीने एआयचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु केलाय.
कंपनीला झाला तोटा
2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत झोमॅटो कंपनीचा निव्वळ नफा 57 टक्क्यांनी कमी होऊन 59 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत तो 138 कोटी रुपये होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.