
Pune University Kumbha Mela Issue: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा वादात सापडलं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या एका सर्क्युलेशनला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कुंभमेळ्यात सेवा देणाऱ्या विद्यार्थांना दोन ग्रेड मार्क देण्याचा निर्णय घेतलाय. पण आता भीम आर्मी पाठोपाठ संभाजी ब्रिगेडनेही त्याला विरोध केल्याने पुणे विद्यापीठाचा हा निर्णय वादात सापडला आहे. विद्यार्थ्यांना कुंभमेळ्यातील श्रमदानाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला असून संघटनेची भूमिका प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवली आहे.
विद्यापीठं आरएसएसचा अड्डा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गुणांसाठी कुंभमेळ्यात पाठवणार आहेत. विद्यार्थ्यांना साधू बनवायच का? आरएसएसच्या डोक्यातील सुपीक कल्पना विद्यापीठाच्या माध्यमातून राबवली जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. विद्यापीठं आरएसएसचा अड्डा झाली आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयाला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे, असं संतोष शिंदेंनी म्हटलं आहे.
राज्यामध्ये चुकीचा पांडा पाडला जातोय
एवढ्यावरच न थांबता कोणतही विद्यापीठ किंवा महाविद्यालय शैक्षणिक संस्था ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे . सगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना तिथं समान संधी मिळाल्या पाहिजेत. अस असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमध्ये असा चुकीचा निर्णय घेऊन राज्यामध्ये चुकीचा पांडा पाडला जात आहे, संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. विद्यापीठाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असंही संषोष शिंदे म्हणाले आहेत. आम्ही पुणे विद्यापीठाच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलनही करु असं संभाजी ब्रिगेडने सांगितलं आहे.
सर्व विद्यार्थ्यांना साधू बनवायचं आहे का?
“ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधक विचार अंगीकारुन विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानार्जन मिळावं म्हणून शिक्षणाची चळवळ सुरु केली. त्यांच्या नावाने विद्यापीठ आहे. खरं तर धर्मनिरपेक्ष विद्यापीठं असली पाहिजेत. जातीला, धर्माला किंवा जातीयवादाला विनाकारण स्थान देऊ नये तर शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं हा शैक्षणिक उद्देश असेल तर विद्यापीठ अशाप्रकारे एका विशिष्ट धर्मासाठी किंवा जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कुंभमेळ्याला पाठवत आहे. सर्व विद्यार्थ्यांना साधू बनवायचं आहे का? विद्यापीठ असा निर्णय घेणार असेल तर या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं संषोष शिंदेंनी जारी केलेल्या व्हिडीओत ब्रिगेडची भूमिका मांडताना म्हटलं आहे.
सिनेट सदस्य तिथे गोट्या खेळतात का?
संषोष शिंदेंनी, “कुलगुरू मोहोदय, विद्यापीठ प्रशासनाने हा जो निर्णय घेतला आहे तो पाहता सिनेट सदस्य तिथे काय गोट्या खेळतात का? असा प्रश्न पडतो. यावर कोणाचं नियंत्रण नाही का? विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन गुणांसाठी साधूंमध्ये पाठवून काय साध्य करणार आहात? विद्यापीठाला एवढं हिंदूत्ववादी विचाराचं काम करायचं असेल तर आरएसएसची मंडळी कुठे आहेत? ज्यांना धर्माचं काम करायचं आहे त्यांना तिथे काम द्या. पण त्या विद्यापीठामध्ये सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेतात. तुमच्या दोन मार्कासाठी त्यांच्या डोक्यात विनाकारण चुकीच्या गोष्टी भरु नयेत अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे,” असंही म्हटलं आहे.
शिक्षणाच्या धार्मिकपणाच्या खेळाला आमचा विरोध
“आम्हाला आमचा धर्म आमच्या चार भिंतीमध्ये स्वीकारावा, त्याचं संगोपण करावं असा अधिकार आहे. मात्र विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षणाच्या धार्मिकपणाच्या खेळाला आमचा विरोध आहे. ज्यांनी कोणी हा निर्णय घेतलाय तो मागे घ्या. सरकारने अशा गोष्टींना थारा देऊ नये. हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आंदोलन करणार. आम्ही हे खपवून घेणार नाही,” असा इशारा ब्रिगेडनं विद्यापीठाला दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



