
शहरात सध्या अघोषित लोडशेडिंगचे चटके नागरिकांना बसत आहेत. वारंवार तक्रारी करून उपयोग नाही. महाविरतणकडून सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक समस्येकडे कानाडोळा करण्यात येत असल्याने अनियमित विद्युत पुरवठ्याचा मुद्दा शहरात तापला आहे. यावर मंगळवारी काँग्रेसने
.
मागील काही दिवसांपासून शहरात अचानक वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्या निर्माण झाली आहे. शहरात थोडे जरी वादळ सुटले तरी दोन-दोन तासासाठी बत्ती गुल असते. विशेष म्हणजे अनेकदा वादळाशिवायची सकाळी, दुपारी, सायंकाळी अनेक तास वीज पुरवठाच नसतो. मुख्य म्हणजे याबाबत कुठलीही पूर्वसूचना देण्यात येत नाही. विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढत चालले आहेत. अघोषीत लोडशेडिंग करून उर्वरित पान ४ गोरक्षण रोड, जुना कापड बाजार, टिळक रोड, जुने शहरातील बाळापूर रोड, डाबकी रोड विठ्ठल मंदिर, गुलजार पूरा, शिवाजी नगर, भीमनगर, गणेश नगर, गोडबोले प्लॉट, खोलेश्वर, रामदासपेठ, अकोट फैल आदी भागातील वीज पुरवठा मागील काही दिवसात अचानक खंडित होत आहे. दर दिवसाआड दोन-दोन तास अघोषित लोडशेडिंग सुरू असल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात विनाकारण विजेचा लपंडाव सुरू आहे. हा प्रकार सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींसोबत राहून महावितरणचे कुठले अधिकारी करीत असतील, तर याद राखा. लवकरात लवकर हा विजेचा खेळखंडोबा बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा. असा दमही आ. पठाण यांनी यावेळी दिला.
प्रतिनिधी | अकोला वारंवार िवद्युत पुरवठा खंडीत होत असून, आता महावितरणच्या संबंधित अभियंत्यांविरोधात न्यायलयात याचिका दाखल करण्याचा इशारा जुने शहरातील प्रसन्न जकाते यांनी दिला आहे. याबाबत विधिज्ञांशी चर्चा केली असून, लवकरच याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वाधिक अनियमित विद्युत पुरवठ्याची समस्या जुने शहरात आहे. गत तीन वर्षांपासून अकोला विशेषत: जुने शहरातील आणि ग्रामीण भागातीलही विजेचा खेळखंडोबा कायम आहे. क्षणाक्षणाला वीजपुरवठा बंद होणे; तासनतास अकोला अंधारात बुडणे, हे आता नेहमीच झालेले आहे. सातत्याने तीन वर्ष पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना सुरळीत आणि पूर्णवेळ वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यश आलेले नाही. ग्राहकांच्या तक्रारीला महावितरण कंपनीचे काही अभियंते वटाण्याच्या अक्षता लावत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वी उर्जा खाते व अकोल्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही होती. मात्र त्यानंतरही विद्युत पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
राजकीय कुरघोडीचा अकोलेकरांना ताप अनियमित विद्युत पुरवठ्याची सर्वाधिक समस्या ही विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघात आहे. भाजपकडे ३० वर्षांपासून असलेल्या या मतदारसंघावर गत वर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे तर सत्ताधारी भाजप विद्युत पुरवठच्या समस्येकडे कानाडोळे करीत आहे का, असा सवाल उपस्थित होत असून, विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर समाज माध्यमांवर नागरिक याच अनुषंगाने संताप व्यक्त करतात. यंदा महापालिका निवडणूक होणार असून, पश्चिममध्ये काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. त्यामुळे काँग्रेस मुलभूत सुविधांबाबत आक्रमक होण्याची एकही संधी सोडत नसून, राज्यातील सत्ताधारी भाजपकडेच बोट दाखवते. भाजपही वेळोवेळी हिशोब चुकते करते. म्हणे खेद वाटतो… प्रसन्न जकाते यांना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी (अकोला शहर उपविभाग क्रमांक १) उत्तर दिले. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे होणाऱ्या असुविधेबद्दल आम्हाला अत्यंत खेद वाटतो. आम्ही आपल्या समस्येला गंभीरतेने घेत आहोत आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलत आहोत. कृपया धीर धरा, लवकरच ही समस्या पूर्णपणे सोडवली जाईल. आपली आणखी काही समस्या असल्यास कृपया आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा, असा सल्ला दिला.
अकोला पश्चिम मतदारसंघात विशेष भारनियमन
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.