digital products downloads

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!: निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई – Pune News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:  निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई – Pune News



पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी धडक कारवाई केली असून, पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 अशा एकूण 40 उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासह त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागात 2 डिसेंबर 2025 रोजी एकूण 60 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या, तर 14 जानेवारी 2026 रोजी 6 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मात्र या निवडणुका लढवणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10 (1ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 16 (1ड) मधील कायदेशीर तरतुदींनुसार विहित 30 दिवसांच्या मुदतीत आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाकडे सादर न केल्याचे यातून उघडकीस आले आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, 5 व 25 मे 2026 रोजी पुणे विभागीय आयुक्तांसमोर संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र या सुनावणीदरम्यान उमेदवारांकडून कोणताही समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने, निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व उमेदवारांना आदेशाच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp