
अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मत्स्य विभाग आणि महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित कामे, विशेषतः पाण्याच्या टाकीचे बांधकाम आणि अन्य आवश्यक विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले. प्रकल्पाच्या उर्वरित विकासकामांबाबत आणि तांत्रिक बाबींवर आवश्यक तपासणी करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासंदर्भातील बहुतांश कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पाचे प्रभावी संचालन, आरएफटी/ईओआय प्रक्रिया आणि भविष्यातील कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ही समिती आगामी १५ जूनपर्यंत सविस्तर अहवाल सादर करणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेमार्फत बारमाही तलावांमध्ये उत्पादित होणारे मासे या प्रकल्पाशी जोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, नोडल अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






