
पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि साठा करणाऱ्या टोळीवर पंढरपूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील तब्बल १५ मजुरांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय मजुरांसह त्यांना कामाला लावणाऱ्या पंढरपूरच्या ४ स्थानिक वाळू मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महसूल आणि पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली. सोमवारी तहसीलदार सचिन लंगुटे, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक जुना दगडी पूल ते रेल्वे पूल दरम्यान चंद्रभागा पात्रात पेट्रोलिंग करत होते. यावेळी अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत काही व्यक्ती शासकीय संमतीशिवाय, विनापरवाना वाळू उपसा करताना रंगेहाथ आढळले. पथकाने तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून १५ मजुरांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान तहसीलदारांच्या आदेशाने, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे तराफे जेसीबीच्या साहाय्याने पाण्यात ढकलून देऊन जाळून नष्ट करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून लोखंडी खोरे, पाट्या, स्टीलच्या बादल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या मजुरांची चौकशी केली असता, हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील चंदवली, बलिया, गाजीपूर आणि बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. पंढरपूर येथील स्थानिक वाळू मालकांनी नदीचे पात्र पोखरण्यासाठी या परप्रांतीय मजुरांचा वापर सुरू केला होता. मजुरांनी दिलेल्या कबुलीनुसार खालील स्थानिक मालकांच्या सांगण्यावरून हा वाळू उपसा सुरू होता. अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत काही व्यक्ती शासकीय संमतीशिवाय, विनापरवाना वाळू उपसा करताना रंगेहाथ आढळले. पथकाने तत्काळ कारवाई करत घटनास्थळावरून १५ मजुरांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान तहसीलदारांच्या आदेशाने, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे तराफे जेसीबीच्या साहाय्याने पाण्यात ढकलून देऊन जाळून नष्ट करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






