
राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज कोल्हापूर शहरासोबत ग्रामीण भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असल्याचे समजते. तसेच वीज पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थां
.
हवामान विभागाने आज पावसाचे अलर्ट जारी केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांनाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान केंद्रानुसार, नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईसह अहिल्यानगरचा पट्टा गाठला आहे. आता मान्सून पूर्वेकडील भागात सरकत आहे. पुढील 48 तासांत विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा या भागात मान्सून व्यापला जाणार आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रात 12 ते 17 जूनपर्यंत बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात तीव्र व अतितीव्र पावसाची हजेरी लागणार आहे. 15 जूनपर्यंत कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास असणार आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह वीज पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.