
मुंबईच्या खारघर उपनगरातील सेक्टर 34 मधील ‘ट्रायसिटी’ इमारतीमध्ये रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ माजली. शॉर्टसर्किटमुळे लागलेली ही आग इमारतीच्या 10 व्या मजल्यापासून 14 व्या मजल्यापर्यंत पसरली होती. अग्निशमन दला
.
अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार्य
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह आणि खारघर पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधून धुराचे मोठे लोट येत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेत, काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक विभाग आणि पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे इमारतीचे मोठे नुकसान टळले, तसेच रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
चार जणांना रुग्णालयात दाखल
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धुरामुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारद्वाज (31), वाणीच नीरज भारद्वाज (9), तेजस्वी राजेश कुमार सिंग (19) आणि यशस्वी राजेश कुमार सिंग (16) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
प्राथमिक अंदाजानुसार, ही आग वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आले होते. याप्रकरणी खारघर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.