digital products downloads

चिखलठाण्यात ट्रकने तरुणाला उडवले: अपघाताचा अंगावर शहारे आणणारा VIDEO समोर; सातारा परिसरात JCB ने मुलाला चिरडले – Maharashtra News

चिखलठाण्यात ट्रकने तरुणाला उडवले:  अपघाताचा अंगावर शहारे आणणारा VIDEO समोर; सातारा परिसरात JCB ने मुलाला चिरडले – Maharashtra News



छत्रपती संभाजीनगर शहरासाठी रविवारचा दिवस ब्लॅक संडे ठरला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांनी शहर हादरले असून बेजबाबदार वाहनचालकांनी दोन हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. चिकलठाणा भागात ट्रकच्या धडकेत एका ३१ वर्षांच्या तरुणाचा जागीच अंत झाला, तर सातारा परिसरात मद्यधुंद जेसीबी चालकाने गल्लीत खेळणाऱ्या ९ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले. या दोन्ही घटनांमुळे शहरभर हळहळ आणि संतापाची लाट उसळली आहे. नारेगावच्या अजीज कॉलनीतील शहबाज कमरोद्दीन बागवान (३१) हा तरुण रविवारी सकाळी १०:३० च्या सुमारास आपल्या मोपेडवरून कामावर निघाला होता. चिकलठाणा आठवडी बाजार परिसरात पाठीमागून येणाऱ्या काळरूपी भरधाव ट्रकने त्याच्या मोपेडला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शहबाज रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात बागवान हा ट्रकच्या अगदी पुढे पडल्यानंतर ट्रकचे समोरील चाक त्यांच्या अंगावरून जाताना दिसून येत आहे. सहा महिन्यांची लेक झाली पोरकी शहबाज हा जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्री दुकानात फायनान्सचे काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. ज्या वयात पित्याने लेकीला बोटाला धरून चालायला शिकवायचे त्याच वयात तिच्या डोक्यावरचे छत्र हरपल्याने नारेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी या घटनेची नोंद केली. अंगणात खेळणाऱ्या मुलावर चालकाने घातला जेसीबी दुसरीकडे, सातारा परिसरातील महालक्ष्मी कॉलनीमध्ये रुद्र जितेंद्र पाटील (९) हा मुलगा घरासमोरील गल्लीत खेळत असताना मद्यधुंद असलेल्या चालकाने जेसीबी थेट रुद्रच्या अंगावर घातला. ही घटना रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीचे अवजड चाक रुद्रच्या छातीवरून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असून तो अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.
मद्यधुंद चालकाची धुलाई अन् पोलिसांत रवानगी साताऱ्यातील अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यधुंद जेसीबी चालकाला संतप्त नागरिकांनी जागीच रोखले. बालकाची अवस्था पाहून नागरिक अधिकच संतप्त झाले आणि त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला सातारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. “रस्त्यांवरील बेजबाबदार वाहनांमुळे आता गल्लीत खेळणारी मुलेही सुरक्षित राहिलेली नाहीत,’ अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केल्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp