digital products downloads

दोन जुनी प्रकरणे, दोन्ही राजे साताऱ्याच्या कोर्टात: परस्पर विरोधातील एक प्रकरण निकाली, तर दुसरे जिल्हा न्यायालयाकडे वर्ग – Kolhapur News

दोन जुनी प्रकरणे, दोन्ही राजे साताऱ्याच्या कोर्टात:  परस्पर विरोधातील एक प्रकरण निकाली, तर दुसरे जिल्हा न्यायालयाकडे वर्ग – Kolhapur News

जुन्या दोन प्रकरणावरून सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आल्याचे पहायला मिळाले. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळे खिंडवाडी य

.

याबाबत मिळालेली माहिती अशी, साताऱ्यातील सन 2017 मधील सुरु बंगला राडा प्रकरण आणि खिंडवाडीतील नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरु आहेत. या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये आज न्यायालयात खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे.

न्यायालयाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून 2017 मध्ये शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरु निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळे ते सेशन कोर्टातून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यांत सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पहायला मिळाली.

दोन जुनी प्रकरणे, दोन्ही राजे साताऱ्याच्या कोर्टात: परस्पर विरोधातील एक प्रकरण निकाली, तर दुसरे जिल्हा न्यायालयाकडे वर्ग - Kolhapur News

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp