
कजगाव (ता.भडगाव) येथे थांबा जाहिर झालेल्या नाशिकरोड बडनेरा गाडीला तात्काळ थांबा देण्यात यावा.अन्यथा ितव्र आंदोलन करू. या मागणीचे निवेदन जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ व रेल्वे विभागाच्या डी.आर.एम.इति पांडे यांना पाठवण्यात आले. रेल्वे विभागाच्या वतीने कजगाव स्टेशन मास्तर डी. एस. मीना यांनी निवेदन स्वीकारले. गेल्या तीन महिंन्यापुर्वी कजगाव रेल्वे स्थानकावर बडनेरा नाशिकरोड या गाडीला थांबा मंजुर झाला. त्या संदर्भातील अनेक वेळा मागणी करूनही गाडीला प्रत्यक्ष थांबा मिळत नसल्याने अखेर कजगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे. खासदार व डी.आर. एम,यांना पाठविलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कजगाव येथे बडेनरा नाशिकरोड या गाडीला थांबा मंजुर झाला आहे. त्या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी घोषणा केली होती. गाडी थांबण्याबाबत विचार न झाल्यास आंदोलन करणार गाडी थांबण्याबाबत विचार न झाल्यास आम्ही सर्व कजगाव व परिसरातील ग्रामस्थ कजगाव रेल्वे स्थानकावर कायद्याचे काटेकोर पालन करून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हा समन्वयक अनिल महाजन, सामाजिक कार्यकर्ते नीलेश पाटील, दशरथ पाटील, रत्नाकर सोनार, आनंदा पाटील, संजय महाजन, सागर कुमावत व अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.