
छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहासातील काळा डाग आहे. औरंग्याची कबर तिथे ठेवली आहे. आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच माणसिकता आहे. कबर काढण्यासाठी आम्ही तयार बसलो आहोत, या मंत्री नीतेश राणेंच्या वक्तव्यानंतर राज्यात सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे.
.
दरम्यान नीतेश राणे यांच्या औरंगजेबाची कबर काढून फेकण्यासाठी तयार आहोत या वक्तव्यानंतर होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांना संवेदनशील भागात विशेष देखरेखीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वातावरण बिघडवण्याचा आणि दंगली भडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ज्या भागांमध्ये यापूर्वी जातीय, धार्मिक तणाचाची परिस्थिती निर्माण झाली, अशा संवेदनशील ठिकाणी पाळत ठेवत पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी खबरदारी म्हणून काळजी घेण्याचे सांगितले आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी अनेकदा अंगावर जबदस्तीने रंग उडविल्याने वादावादीचे प्रकार घडतात. त्यामुळे वादाचे पर्यावसन कोणत्याही धार्मिक तेढीत होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले
नीतेश राणेंचे वक्तव्य काय?
नीतेश राणे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहासातील काळा ठपका आहे. औरंग्याची कबर तिथे ठेवली आहे. आमच्या सरकारच्या प्रमुखांची पण तीच माणसिकता आहे. कबर काढण्यासाठी आम्ही तयार बसलो आहोत. आमचे पत्रकार मित्र विचारत असतात नीतेश राणेजी कब कबर निकालेंगे. निकालेंगे पण तुमको नहीं बताएंगे. हे काही बारसे तुम्हाला सांगायला, ये येथे नाव ठेवायला. 50 गड किल्याच्या वर जेव्हा जेव्हा अतिक्रमण काढली तेव्हा पत्रकारांना सांगितले नाही. पहिले तोंडली मग ब्रेकिंग न्यूज चालवली. म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो, काय तुम्हाला जास्त माहिती देत बसणार नाही. कितीही पत्रकार मानेवर बसले तरी सांगणार नाही. पण जे ठरले आहे ते ठरले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.