
शहरातील प्रभाग क्रमांक ११ छत्रपती संभाजी महाराजनगर परिसरातील व वसंत हौसिंग सोसायटी येथील डॉ. बहादुरे घर ते गुरुदीप कांत घरासमोरील रस्ता, धात्रक घर ते राऊफ मिर्झा घरापर्यंत व फुलवाणी भवन ते पुरंदरे घर, सत्यकुमार नायर ते शांतराम मिस्तरी घरापर्यंत या रस
.
नागरिकांना वीर सावरकरनगर ते गावात जाण्यासाठी वाहनावरून व पायी चालणे अवघड झालेले आहे. पाऊस पडल्यावर किमान गुडघ्यापर्यंत पाणी व दुसऱ्या रस्त्यांवर चिखल असतो. वाहन व्यवस्थित चालवता येत नाही. तसेच वसंत हौसिंग व छत्रपती संभाजी महाराजनगर भागातील नागरिकांना देखील अडचण होत आहे. करंजवण नवीन पाइपलाइनच्या कामामुळे देखील या परिसरातील रस्त्यांवर खड्डे झालेले आहे. ठरावातील कामे लवकरातलवकर पूर्ण करावी व तात्पुरत्या स्वरूपात त्या भागातील नेहमी साचणाऱ्या पाण्याचा निचरा कसा करता येईल, दोन्ही भागातील चिखल कसा कमी करून तिथे तात्पुरता कच्चा रस्ता करण कसे शक्य होईल याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद पाचोरकर यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.