
अहमदाबाद येथील विमान अपघातात एकूण 265 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेत मुंबई जवळच्या मुलुंडच्या रहिवासी श्रद्धा धवन यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. श्रद्धा या एअर इंडियामध्ये सीनियर क्रृ मेंबर होत्या. त्यांचे पती राजेश हे देखील एअर इंडियामध्येच का
.
श्रद्धा धवन या 20 वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी श्रद्धाचे भाऊ अमेरिकेतून अहमदाबादला येणार आहेत. त्यानंतर डीएनए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. श्रद्धाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
या दुर्घटनेत मुंबईलगतच्या डोंबिवली येथील रोशनी सोनघरे या तरुणीचा मृत्यू झाला. रोशनी ही एअर इंडियात हवाई सुंदरी होती. एवढेच नव्हे तर ती एक फेमस ट्रॅव्हल इन्फ्लुएंसरही होती. वयाच्या अवघ्या 27 वर्षी झालेल्या तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयाला जोरदार धक्का बसला आहे.
बदलापूरच्या दीपक पाठक या क्रू सदस्याचाही बळी गेला
दुसरीकडे, या विमान अपघातात बदलापूरच्या दीपक पाठक या क्रू सदस्याचाही बळी गेला आहे. 35 वर्षीय दीपक हा घाटकोपर येथे पत्नीसोबत राहतो. तो मूळचा बदलापूरचा आहे. आई-वडील, दोन बहिणी, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी त्याने आईला मी निघालोय, पोहोचल्यावर बोलतो, असा मेसेज केला होता. हा मेसेज अखेरचा ठरला. विशेष म्हणजे, आजही त्याचा फोन लागतो, पण तो उचलला जात नाही, अशी भावुक प्रतिक्रिया दीपकच्या बहिणीने दिली आहे.
पुण्याच्या इरफानचाही मृत्यू
पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील एका तरुणाचाही मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. संत तुकाराम नगर येथील रहिवासी असलेला 22 वर्षीय इरफान शेख असे या मृत तरुणाचे नाव आहे. इरफान गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होता. नुकताच तो ईद साजरी करण्यासाठी घरी आला होता. परंतु काळाने घाला घातला आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू सदस्या अपर्णा महाडिक यांचेही निधन
दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू सदस्या अपर्णा महाडिक यांचेही निधन झाले आहे. अपर्णा ह्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नातेवाईक होती. अपर्णा ही माझ्या धाकच्या बहिणीची सून आहे. तिचे कुटुंब गोरेगावात राहते, अशी माहिती तटकरे यांनी स्वतः दिली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.