digital products downloads

“मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” म्हणत ट्यूशन हॉलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, लातूरमध्ये धक्कादायक प्रकार

“मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” म्हणत ट्यूशन हॉलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, लातूरमध्ये धक्कादायक प्रकार

वैभव बालकुंदे, झी मिडिया, लातूर : लातूर शहरातून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. “मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं” अशी मग्रूर भाषा वापरत लातूरच्या ट्यूशन एरियातील एका खासगी ट्यूशन हॉलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने ट्यूशनसाठी येणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

संबंधित विद्यार्थिनी ट्यूशनसाठी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये आली असताना शिक्षकाने एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केले. या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरून गेली. घरी आल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे आरोपी शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

(हे पण वाचा – … अन् विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या ओठाचा लचका तोडला, घटना CCTV मध्ये कैद; कारण आले समोर) 

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्षणाच्या पंढरी असलेल्या लातूर शहरात शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः खासगी क्लासेसमध्ये जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ट्यूशन क्लासेस, खासगी शिकवण्या आणि शिक्षण संस्थांवर अधिक कठोर नजर ठेवण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. पोलिसांकडूनही नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp