
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर उत्तम जानकर यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. शेतक
.
उत्तम जानकर म्हणाले, एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले आणि निरपेक्षपणे काम करणारे नेते असून त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतील म्हणून आपण शिंदे यांची भेट घेतल्याचा खुलासा जानकर यांनी केला आहे.
पुढे बोलताना उत्तम जानकर म्हणाले, यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची आळंदी येथे आणि आता पंढरपूरमध्ये म्हणजे दोन्हीही पवित्र ठिकाणी भेट झाली आहे. शिंदे हे नेहमीच त्यांनी घेतलेले निर्णय पूर्ण करतात आणि यामुळेच शेतकरी कर्जमाफीचा न्याय शिंदेच देऊ शकतील असा दावा जानकर यांनी केला आहे.
तसेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जेव्हा येत असतात तेव्हा मतदारसंघातील आरोग्याची किंवा इतर अडचणीची कामे करून घेण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागते आणि म्हणूनच मी एकनाथ शिंदे यांना भेटलो, असे उत्तम जानकर यांनी म्हटले आहे. उत्तम जानकर यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्याने भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तम जानकर म्हणाले, जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी ती अडचण मला पुढच्या निवडणुकीत येईल. एकदा विधानसभेला कागदपात्रांची छाननी झाल्यानंतर माझी आमदारकी पाच वर्षे कोणी रद्द करू शकत नाही, असा टोला जानकर यांनी लगावला आहे. जारी जात प्रमाणपत्र रद्द झाले तर हीच लोक पुन्हा मला माझे जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभे करतील, असेही जानकर यांनी म्हटले आहे.
चळवळीतील धडाकेबाज आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे आमदार उत्तमराव जानकर हे नेहमीच आपल्या ठाम आणि आक्रमक भूमिकांसाठी चर्चेत राहिले आहेत. मारकडवाडीतील ईव्हीएम आंदोलन असो, की निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर बड्या नेत्यांवर केलेले थेट आरोप – जानकर यांनी आपली ठसठशीत राजकीय ओळख निर्माण केली आहे. आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचे फोटो व्हायरल होताच राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.