digital products downloads

‘संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो. मात्र…’ ‘त्या’ विधानावर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर

‘संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो. मात्र…’ ‘त्या’ विधानावर सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare on Sanjay Raut : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी अपघाती निधन झालं. अजित पवारांचं असं अचानक जाणं सगळ्यांनाच चटका लावणारं होतं. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणाने मात्र वेगळंच वळण घेतलं. यामध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यावर प्रयत्नशील होते. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला होता की, तटकरे आता शरद पवारांना मार्गदर्शन करत आहे. यावर सुनील तटकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीतून उत्तर दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तटकरेंच संजय राऊतांना उत्तर 

राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाचा प्रश्न आता अधांतरी लटकला आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादी पक्ष NDA सोबत आहे. ज्यांना यायचं आहे त्यांनी सोबत यावं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. यावर विलीनीकरण हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. मात्र तटकरे आता शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं ते आता पवारांनाच सल्ले देऊ लागले असल्याचं राऊतांनी म्हंटलंय. तर अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर लगेचच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आधी कुणी सुरु केली असा सवाल सुनील तटकरेंनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात केला. 

शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिलीय का?

राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंनीच शरद पवारांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिलीय का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण भाजपसोबत ज्यांना यायचंय त्यांनी विचार करा, आपण चर्चा करू असं विधान सुनील तटकरेंनी केलंआहे. दरम्यान यानंतर राऊतांनी तटकरेंना टोला लगावला आहे. 

अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. विलिनीकरणावर दादांसोबत चर्चा झाल्याचा दावा राष्ट्रवादी एसपीच्या नेत्यांनी केलाय. खुद्द शरद पवारांनी देखील त्यासंदर्भात रोखठोक भूमिका मांडलीय.. दरम्यान यानंतर आता सुनील तटकरेंनी थेट शरद पवारांना भाजपसोबत येण्याचं आवाहन केल्याचं बोललं जातंय, भाजपसोबत येण्याचा विचार करा मग चर्चा करू असं विधान सुनील तटकरेंनी केलंय.. त्यामुळे तटकरेंनी शरद पवारांना एनडीएत येण्याची
ऑफर दिलीय का? असाही प्रश्न उपस्थित होतो. 

संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो. मात्र…

सुनील तटकरेंनी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला, दरम्यान राऊतांच्या टीकेला टू द पॉईंटमधून सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना तिखट शब्दात उत्तर देऊ शकतो. मात्र, त्यांच्या प्रकृतीकडे बघून काही बोलत नसल्याचा टोला सुनील तटकरे यांनी राऊतांना लगावला आहे.

(हे पण वाचा – ‘…. तेव्हाही मलाच खलनायक ठरवण्यात आलं होतं’, सुनील तटकरेंनी व्यक्त केली मनातली खंत) 

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून निलेश लंकेंनी देखील मोठं विधान केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीत विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, येत्या काळात सर्व व्यवस्थित होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे तोच निर्णय होणार असंही यावेळी खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून शरद पवारांचे नेते कमालीचे सकारात्मक आहेत. मात्र, दादांच्या राष्ट्रवादीमधून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंची भूमिका विलिनीकरणाची नसल्याचं त्यांच्या विधानातून दिसतंय, कारण पुन्हा एकदा तटकरेंनी विलिनीकरणावर बोलताना थेट पवारांच्या राष्ट्रवादीलाच भाजपसोबत येण्याचं आवाहन केलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp