digital products downloads

अजित पवारांचा शेवटचा व्हिडीओ अखेर आला समोर; राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला रिलीज, म्हणाले होते, ‘मी फक्त…’

अजित पवारांचा शेवटचा व्हिडीओ अखेर आला समोर; राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला रिलीज, म्हणाले होते, ‘मी फक्त…’

Ajit Pawar Last Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांचं निधन राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांचे अनेक जुने व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. दरम्यान त्यांचा दुर्घटनेपूर्वीचा शेवटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवारांचा हा व्हिडीओ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड करण्यात आला होता. मतदारांना आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. ज्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला अजित पवारांनी मतदानासंदर्भात आवाहन केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक पत्र काढलं असून, त्यात लिहिलं आहे की, “महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 करीता मतदारांना उद्देशून संदेश देणारा व्हिडीओ शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी देवगिरी या शासकीय निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला आहे. सदर व्हिडीओ प्रिय मतदार बंधू भगिनींसाठी व प्रसार माध्यमांकरिता प्रसारित करण्यात येत आहे”.

अजित पवार व्हिडीओत म्हणाले होते की, “बंधू, भगिनींनो आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मुलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून, ज्येष्ठाच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळला आहे. मी फक्त शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. पाणी पुरवठा, रस्त्याची कामं, आरोग्य सुविधा किंवा शेतीसाठी एआय, डिजिटल साधनं असोत हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आहे”. यावेळी त्यांनी पक्षाला निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन केलं होतं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp