digital products downloads

‘अजित पवारांच्या विमानाचा स्फोट झाला की घडवून आणला?’ ‘बारामती विमानतळाच्या आजूबाजूला..’; ‘राजेश टोपेंना चुकीचा..’

‘अजित पवारांच्या विमानाचा स्फोट झाला की घडवून आणला?’ ‘बारामती विमानतळाच्या आजूबाजूला..’; ‘राजेश टोपेंना चुकीचा..’

Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असतानाच या वादामध्ये एका पक्षाच्या अध्यक्षाने उडी घेतली आहे. अजित पवारांसहीत सहा जणांचा मृत्यू झालेला हा भीषण अपघात बारामती विमानतळाजवळील गोजुबावी (Gojubavi) गावाच्या परिसरात झाला. घटनास्थळी पोहोचलेल्यांमध्ये गोजुबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळेही होते. आटोळेंनी घटनास्थळी काय पाहिलं याबद्दल बोलताना एक धक्कादायक माहिती दिली. कल्याण आटोळेंसहीत गावकरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोर काय दिसलं याबद्दल बोलताना, “विमानाचा दरवाजा उघडा होता. त्यातून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, असं आम्हाला दिसलं. तितक्यात मोठा स्फोट झाला, आमच्या नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले. आगीचे लोळ आणि आवाज इतके भीषण होते की आम्ही सगळेजण मागे पळालो,” असं कल्याण आटोळे म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source

सरपंच दिशाभूल करणारी माहिती देत आहेत

याच आटोळेंच्या भेटीचा संदर्भ देत अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी,  “विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं सरपंचांनी सांगितलं,” असा दावा केला. या दाव्यामुळे पुन्हा नवा संभ्रम निर्माण झालेला असतानाच ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी आता अपघातासंदर्भात आटोळे दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सोशल मिडीयावरुन एक पोस्ट केली आहे.

“अजित पवारांचं विमान मी पाहिलं.  कुणी तरी निळ्या पॅन्टवाला उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात स्फोट झाला अशी माहिती देणारे आटोळे हे काहीतरी खोटं बोलत असल्याचं दिसत आहे. ते दिशाभूल करणारी माहिती सांगत आहेत. व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमध्ये विमान कललं, खाली आलं आणि एका सेकंदामध्ये त्याचा स्फोट हवेमध्ये दिसला. एवढ्या कमी वेळात त्या विमानाजवळ कोणी पोहचू शकत नाही. आता अटोळे सांगत आहेत की विमान खाली पडल्यावर आम्ही मोटरसायकलवर गेलो. पडलेल्या विमानातून कोणीतरी उतरण्याचा प्रयत्न करत होत तितक्यात स्फोट झाल्याचा त्यांचा दावा आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसतंय विमान कललं, पडलं आणि स्फोट झाला. आटोळे कशामुळे दिशाभूल करत आहेत हे आम्ही विचारतोय,” असं दिपक केदार यांनी म्हटलं आहे. 

बारामती विमानतळाच्या आसपास…

“अजित पवारांचा घातपात करणारी प्रक्रिया ही बारामती विमानतळाच्या आसपास होती का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. कारण त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दिशाभूल करणारी माहिती समोर येत आहे. कागदासंदर्भात प्रश्न आहे. कागदं पडले आहेत ते जळाले नाहीत, हा प्रश्न आहे. जे प्रश्न निर्माण होत आहेत ते घटनास्थळाच्या किंवा विमानतळाच्या आजूबाजूचे आहेत. राजेश टोपेंना चुकीचा टाईम सांगणारा तरुणही विमानतळावरचाच आहे. तत्काळ त्या ठिकाणी धावत गेलेले आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. गृहविभागाने सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. मिडियात हे सरपंच जी चुकीची माहिती पसरवत आहेत ती संभ्रम निर्माण करणारी आहे,” असंही दिपक केदार यांनी म्हटलं आहे.

“विमानाचा स्फोट झाला की स्फोट घडवून आणला याची चौकशी होत नाही हे दुर्देव आहे. बारामती विमानतळाच्या आजूबाजूच्या हलचाली आधुनिकपणे तपासण्याची गरज आहे. शेवटचा कॉल ज्याच्याकडून आला तेव्हा अजित पवारांचं लोकेशन काय होतं. ईडीआर, सीडीआर समोर आला पाहिजे. घटनाक्रम बाहेर आला पाहिजे. पारदर्शक घटनाक्रम बाहेर येत नाही हे या घटनेमागील दुर्देव असल्याचं मी मानतो,” असंही दिपक केदार व्हिडीओत म्हणताना दिसतात.

'अजित पवारांच्या विमानाचा स्फोट झाला की घडवून आणला?' 'बारामती विमानतळाच्या आजूबाजूला..'; 'राजेश टोपेंना चुकीचा..'

“अजितदादा पवार यांच्या अपघातावेळी मी तिथं होतो. कुणी तरी निळ्या पॅन्टवाला उडी मारण्याचा प्रयत्न करत होता ही सरपंच आटोळे यांची दिशाभूल करणारी माहिती आहे. अजित पवार यांचा घातपात करणारी प्रक्रिया बारामती विमानतळाच्या आसपास सक्रिय होती का? अशा संशय निर्माण झाला आहे,” असं दिपक केदार यांनी म्हटलं आहे. “दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे विमानाचा स्फोट झाला की स्फोट घडवून आणला याचा तपास गृहविभागाने केला पाहिजे,” अशी मागणीही दिपक केदार यांनी केली आहे.

“शेवटचा कॉल ज्या व्यक्तीला आला त्यावेळी अजित पवार यांचे लोकेशन कुठं होत याचा तपास झाला पाहिजे. सरपंच आटोळे चुकीची माहिती देत आहेत कारण सीसीटीव्ही मध्ये दिसतंय विमान कलले आणि लगेच एक सेकंदात स्फोट झालेला हवेत दिसतो मग निळी पँट वाला माणूस बघायला 4 सेकंद आटोळेला मिळाले कसे?” असा सवाल दिपक केदार यांनी उपस्थित केला आहे. “सखोल चौकशी होत नाही हे दुर्दैव आहे,” असंही दिपक केदार यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताची थ्री लेअर चौकशी केली जात असून तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विमानात शेवटच्या क्षणी काय घडलं होतं हे शोधून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp