digital products downloads

मुंबई महापौर निवडणुकीआधी राज आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फिरवले काटे

मुंबई महापौर निवडणुकीआधी राज आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फिरवले काटे

NCP to join Mahayuti in BMC: मुंबईत राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत सोबत असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीला पाठिंबा देणार आहे. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी शरद पवारांचे एकमेव नगरसेवक अजिंक्य रावराणे महायुतीच्या गोटात सामील झाले आहेत. यामुळे ठाकरे बंधूंसमोर आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी शिंदेंना पाठिंबा देण्याकरता एकत्र आल्याचं चित्र आहे. ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने महापौर निवडणुकीआधी बाजू बदलली आहे. प्रभागातील निधीकरता, विकासाकरता महायुतीसोबत जात असल्याचं अजिंक्य रावराणेयांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं भूमिका बदलल्याची माहिती आहे. अजिंक्य रावराणे 2 वाजता कोकण भवनात जाणार आहेत. दरम्यान भाजपा नगरसेवक नवनाथ बन यांनी ठाकरेंची शिवसेना महापालिकेत एकटीच राहील असा टोला लगावला आहे. 

महापौर निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार?

मुंबईत महापौर, उपमहापौर निवडणुकीत आता चुरस आणखी वाढली आहे. कारण आता ठाकरेंची शिवसेना महापौर, उपमहापौर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर ठरला आहे. 2 दिवसांनंतर म्हणजेच 7 फेब्रुवारीला महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. मात्र मुंबई महापौर, उपमहापौर निवडणुकीत आता चुरस आणखी वाढली आहे. कारण ठाकरेंची शिवसेना महापौर, उपमहापौर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर भाजपचा महापौर बसणं हा मुंबईसाठी काळा दिवस असेल असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. 

11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या 15 मिनिटं आधी असणार आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे?

भाजप- 89
शिवसेना (UBT)- 65
शिवसेना (शिंदे)- 29
काँग्रेस – 24 
मनसे- 6 
एमआयएम- 8 
राष्ट्रवादी- 3 
समाजवादी पक्ष- 2 
राष्ट्रवादी (श.प.) – 1 
—————-
एकूण- 227

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp