digital products downloads

‘तो येडाच आहे **, बारमध्ये बाया…’, भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये शाब्दिक युद्ध, म्हणाले ‘मला भुंकणाऱ्या…’

‘तो येडाच आहे **, बारमध्ये बाया…’, भास्कर जाधव आणि रामदास कदमांमध्ये शाब्दिक युद्ध, म्हणाले ‘मला भुंकणाऱ्या…’

Bhaskar Jadhav vs Ramdas Kadam: राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सुरु असून नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. कोकणात रामदास कदम आणि भास्कर जाधव आमने-सामने असून शाब्दिक युद्ध रंगलं आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर पातळी सोडून टीका केली आहे. रामदास कदम यांनी सख्ख्या भावाला जेलमध्ये टाकलं असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांनी भूंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही असं म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

खेड तालुक्यातील कोरेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार शब्दात हल्लाबोल केला. भास्कर जाधव म्हणाले की, “सुपडा साफ होणार आहे. होणार आहे की, नाही? जाऊद्या पैसा पैसा. रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तो येडाच आहे साला. खरं तर मी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलत नाही. सारखा तो माझ्यावरून बोलतोय. परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथे पण मी अरे तूरे करत नाही, पण आता मी त्याला अरे तुरेच करणार”.

“सख्या भावाला जेलमध्ये टाकलं. गणपतीचा सण होता, दसऱ्याचा सण होता, दिवाळीच सण होता. सख्ख्या भावाच्या घरात दिवाळीचा दिवाही लागला नसेल. पण या माणसाला पाझर फुटला नाही,” असंही भास्कर जाधव म्हणाले. 

“तुम्ही हफ्तेखोर, हफ्ते खाता. याचे पैसे घेऊ नका, आताच सांगतो. पत्नीच्या नावे असलेल्या बारमधले हे पैसे आहेत. ती माऊली कशातही नसते. तिच्या नावाने जो बार आहे, तिथे बाया नाचवत होते, छमछम करत होता. पैसा आला की उडवायचा. लाज नाही वाटत तुला,” असंही त्यांनी म्हटलं. 

रामदास कदम यांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “त्यांच्या पायाखालची जमीन, वाळू घसरलेली आहे. गुहागर मतदारसंघासह सर्व ठिकाणी त्यांना पराभव समोर दिसत आहे. म्हणून कुत्र्यासारखा भुंकणं चालू झालं आहे. मी एवढंच म्हणेन कुत्ते तो भूंकते है हाथी अपने आप चलता है. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठे आहे. या भास्कर कृतघ्नता नही. याला 1995 मध्ये मी शिवसेनेमध्ये आणलं, तिकीच द्यायला लावलं. आता हा कृतघ्न झाला आहे”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp