digital products downloads

चांदूरबाजार कृषी सहायक लाच घेताना रंगेहात पकडला: एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या अनुदानासाठी मागितली होती लाच – Amravati News

चांदूरबाजार कृषी सहायक लाच घेताना रंगेहात पकडला:  एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या अनुदानासाठी मागितली होती लाच – Amravati News



चांदूरबाजार येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला कृषी सहायक सतीश श्रीकृष्ण निमकर (वय ४६, रा. ब्राम्हणवाडा थडी, ता. चांदूरबाजार) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम मिळवून दिल्याच्या मोबदल्यात त्याने ही लाच स्वीकारली. तक्रारदाराच्या वडिलांच्या बँक खात्यात कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत १७ हजार ९५२ रुपये अनुदान जमा झाले होते. ही रक्कम मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून आरोपी निमकरने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात २५ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची पडताळणी दोन शासकीय पंचांसमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आरोपी निमकरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp