राजकारण: तामिळनाडूमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार अण्णामलाई, माजी प्रदेशाध्यक्षांनी सोडले भाजपचे सदस्यत्व

राजकारण:  तामिळनाडूमध्ये नवीन पक्ष स्थापन करणार अण्णामलाई, माजी प्रदेशाध्यक्षांनी सोडले भाजपचे सदस्यत्व

  • Marathi News
  • National
  • Annamalai To Form New Party In Tamil Nadu, Former State President Quits BJP Membership

चेन्नई/नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा २ जून रोजी राजीनामा दिला होता. त्यांचे पत्र शुक्रवारी समोर आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले, ‘राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अण्णामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे.’

यानंतर अण्णामलाई यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. सोशल मीडियावरील एका व्हिडिओ मेसेजमध्ये अण्णामलाई म्हणाले, आज आम्ही आमची स्वतंत्र चळवळ उभी करत आहोत. आमचा राजकीय पक्ष तामिळनाडूत २०३१ ची विधानसभा निवडणूक लढवेल. त्यांनी ‘We The Leaders’ नावाचे नवीन व्यासपीठ आणि wetheleader.org नावाची वेबसाइटही लाँच केली. यासोबतच कोईम्बतूरमध्ये ‘एपीजे अब्दुल कलाम सेंटर फॉर एथिक्स अँड पॉलिटिक्स’ संस्था स्थापन करण्याचीही घोषणा त्यांनी केली.

६ वर्षे भाजपमध्ये राहिले

अण्णामलाई कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. नोकरी सोडून ते २०२० मध्ये भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाने त्यांना आधी प्रदेश उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष बनवले.

आता सर्वसामान्यांचे राजकारण करणार अण्णामलाई

अण्णामलाई यांच्या मते, त्यांचा उद्देश तामिळनाडूत बदल घडवणे, राज्यातील राजकारणाची पद्धत सुधारणे हा आहे. राज्यातील जनता अनेक दशकांपासूनच्या प्रस्थापित राजकारणाला कंटाळली असून त्यांना बदल हवा आहे. गेल्या दशकात बदलाच्या लाटा उसळल्या, पण त्या टिकू शकल्या नाहीत.

  • त्यांच्या मते, राजकारण हे फक्त श्रीमंत, व काही विशिष्ट लोकांसाठी आहे, सर्वसामान्यांसाठी नाही, हा विचार मला बदलायचा होता.

अण्णामलाई यांनी नवीन चळवळही सुरू केली आहे, जिचा उद्देश व्यक्तिपूजा व घराणेशाहीची सत्ता नाकारत राज्यातील राजकीय चित्र बदलणे हा आहे. ‘चला बदल घडवूया, परिवर्तन करूया’ (मारुवोम, मात्रुवोम) या तत्त्वावर काम करणाऱ्या या चळवळीचा उद्देश सध्याच्या पक्षांशी स्पर्धा न करता लोकांच्या गरजांना प्राधान्य देणे आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp