मान्सूनने पकडला वेग…गोव्यात पोहोचला: महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पूर्वमोसमी पाऊस, कर्नाटक-तामिळनाडूही मान्सूनने व्यापला – Mumbai News

मान्सूनने पकडला वेग…गोव्यात पोहोचला:  महाराष्ट्रात 8 जूनपर्यंत पूर्वमोसमी पाऊस, कर्नाटक-तामिळनाडूही मान्सूनने व्यापला – Mumbai News



मार्च 2026 मध्ये राज्यात अवकाळी पावसात झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महसूल व वन विभागाने 16 कोटी 71 लाख 59 हजारांचा मदत निधी मंजूर केला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया व गडचिरोलीतील एकूण 22 हजार 123 शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत 7783 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यात संभाजीनगरमधील 17,216 शेतकऱ्यांना 11.89 कोटी रुपये निधी बँक खात्यात दिला जाईल. पावसाची तूट 40% वरून 14% वर हवामान विभागानुसार, 5 जूनपर्यंत देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 14% कमी नोंदवला गेला. मात्र, गेल्या 4 दिवसांत परिस्थिती बरीच सुधारली आहे. पावसाची तूट 40% वरून घटून 14% झाली आहे. आता मान्सून पुढे किती वेगाने ही तूट भरून काढतो, याकडे लक्ष असेल. बँकांना या निधीतून कर्जवसुलीस मनाई आपत्ती निवारणाचा हा मदत निधी बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून कोणत्याही कारणासाठी कापू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, मदत वाटप पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची नावे व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य केले आहे. संभाजीनगरच्या अवकाळीग्रस्त 17 हजार शेतकऱ्यांना 11 कोटी जळगाव | वादळाने केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. रावेर तालुक्यात सायंकाळी 2 दशकातील सर्वात भीषण, ताशी 60 किमी वेगाच्या वादळासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे 23 गावांत 2085 शेतकऱ्यांच्या 1997 हेक्टर शेतीजमिनीवरील 57 लाख 50 हजार केळीखोड भुईसपाट झाले. यात 227 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रावेरला ताशी 60 किमी वेगाने वादळ, 1997 हेक्टरवरील केळी बागा आडव्या केरळमध्ये 3 दिवस उशिरा आलेल्या मान्सून एक्सप्रेसने वेग पकडला आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग पार करून मान्सून योग्य वेळी गोव्यात पोहोचला. दरम्यान, मान्सून महाराष्ट्र्ाच्या उंबरठ्यावर दाखल होण्यापूर्वी अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. 8 जूनपर्यंत मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह अवकाळी पूर्व-मोसमी पावसाची शक्यता आहे. सध्या मराठवाडा ते कोकण व गोवा ओलांडत नैऋत्य अरबी समुद्रापर्यंत 5.8 किमी उंचीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मान्सूनच्या वाटचालीसाठी व पूर्व-मोसमी पावसासाठी अनुकूल आहे, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp