‘तुला दुबईत नोकरी हवी तर धर्म बदल’; ‎शिक्षिकेवर अत्याचार: 6 तोळे सोनं लुटले, आरोपी पसार, छत्रपती संभाजीनगर‎च्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Chhatrapati Sambhajinagar News

‘तुला दुबईत नोकरी हवी तर धर्म बदल’; ‎शिक्षिकेवर अत्याचार:  6 तोळे सोनं लुटले, आरोपी पसार, छत्रपती संभाजीनगर‎च्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Chhatrapati Sambhajinagar News



एकाच शाळेत शिकवणाऱ्या ‎‎सहकाऱ्याने दुबईत नोकरी‎ लावण्याचे व लग्नाचे आमिष‎ दाखवून एका 43 वर्षीय विवाहित ‎‎महिलेवर अत्याचार केला. धर्मांतर ‎‎करण्यास भाग पाडले. परदेशात ‎नोकरी करण्यासाठी धर्म बदलावा ‎‎लागेल, असे सांगून आरोपीने‎ पीडितेचे कथित धर्मांतर घडवून ‎‎आणले. तसेच यूट्यूबवर‎ मंगलाष्टके लावून लग्नाचे नाटक‎ केले. महिलेकडून 3 लाख 41 हजार ‎‎रुपये रोख आणि 6 तोळे सोने ‎उकळले. आरोपी पसार झाला आहे. ‎‎या प्रकरणी हुसेन अबू सोयदान (45,‎रा. कटकट गेट, नेहरूनगर, छ. ‎‎संभाजीनगर) याच्यावर‎ पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ‎‎दाखल करण्यात आला आहे.‎ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार,‎ पीडित महिला एका शाळेत शिक्षिका ‎म्हणून कार्यरत होती. जून 2024‎ मध्ये त्याच शाळेत शिकवणाऱ्या ‎हुसेन सोयदान याच्याशी तिची‎ ओळख झाली. या ओळखीचे‎ रूपांतर मैत्रीत झाले.‎ लाखो रुपयांची उकळली रोख रक्कम दुबईला घेऊन जाण्याचे आश्वासन देणाऱ्या आरोपीने पैशांची गरज‎ असल्याचे सांगितले. जानेवारी ते एप्रिल या काळात महिलेकडून ‎वेळोवेळी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात पैसे घेतले. वेदांतनगर‎ आणि सिडको परिसरातील हॉटेलमध्ये बोलावून त्याने एकूण 3 लाख‎41 हजार रुपये उकळले. पासपोर्टच्या बहाण्याने सोने लाटले‎ 20 एप्रिल रोजी आरोपीने महिलेला पुन्हा निराला बाजार येथील ‎हॉटेलमध्ये नेले. परदेशात जाण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्यासाठी ‎आपल्याला सुरुवातीला पदरमोड करावी लागेल, असे सांगून त्याने ‎महिलेकडून विश्वासाने 6 तोळे सोने घेतले. तो निघून गेला. 25 ‎एप्रिलपासून आरोपीने महिलेशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली.‎ लग्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर 1 जूनपासून ‎त्याचा मोबाइल क्रमांकही बंद येत असल्याने आपली फसवणूक‎ केल्याचे महिलेच्या लक्षात आले.‎ ..तर मुस्लिम धर्म‎ स्वीकारावा लागेल नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये ‎आरोपीने तिला दुबईत नोकरी‎ लावून देण्याचे आमिष दाखवले. तू ‎मला आवडतेस. नवऱ्याला ‎घटस्फोट दे. माझ्यासोबत राहा,‎ अशी भुरळ घालून त्याने महिलेला ‎जाळ्यात ओढले. परदेशात नोकरी‎ करायची असेल तर मुस्लिम धर्म‎ स्वीकारावा लागेल, अशी अटही ‎त्याने घातली. त्यानंतर 4‎ जानेवारीला निराला बाजार‎ परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन ‎त्याने महिलेवर अत्याचार केला.‎ यापूर्वीही महिलेने तक्रार दिली होती.‎ मात्र, त्यावेळी आरोपीने समझोता ‎केला होता. ठरल्याप्रमाणे तो न ‎वागल्याने महिलेने आता नव्याने‎ सविस्तर फिर्याद दिली आहे. मागील‎ तक्रारीत धर्मांतराचा उल्लेख‎ नव्हता. या गंभीर प्रकरणाचा पोलिस ‎पुढील तपास करत आहेत. सूत्रांनी ‎दिलेल्या माहितीनुसार आरोपी‎ दुबईला गेल्याची माहिती आहे.‎ कथित धर्मांतर घडवून आणले‎ एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला महिलेच्या ‎पतीला या प्रकाराची माहिती मिळाली.‎ महिलेला घर सोडावे लागले. यानंतर‎ आरोपीने तिला गारखेडा परिसरात एक‎घर भाड्याने घेऊन दिले. तिथे ‎संसारोपयोगी साहित्य आणण्यासाठी त्याने ‎आणखी 50 हजार रुपये घेतले. 19 एप्रिल‎ रोजी आरोपीने घरातच यूट्यूबवर ‎मंगलाष्टके लावली. एकमेकांना माळा ‎घालत लग्नाचा देखावा केला. मात्र,‎‘दुबईत नोकरीसाठी यायचे असेल तर‎ मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल”, असे‎ सांगून त्याने महिलेला कलमा वाचण्यास ‎भाग पाडले. कथित धर्मांतर घडवून‎ आणले.‎‎‎‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp