नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’: 25 कोटींचा मुद्देमाल जप्त, 1 हजार 739 गुन्हे दाखल; मे महिन्यातील कारवाई – Hingoli News

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांचा अवैध धंद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’:  25 कोटींचा मुद्देमाल जप्त, 1 हजार 739 गुन्हे दाखल; मे महिन्यातील कारवाई – Hingoli News



नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली मे महिन्यात अवैध व्यवसायांविरुद्ध एक अत्यंत व्यापक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरुद्ध कडक कारवाई करत पोलिसांनी २५ कोटी १ लाख २६ हजार २३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या मोहिमेत एकूण १७३९ गुन्हे दाखल करून २४१२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये झालेल्या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. नांदेड जिल्हा: नांदेड जिल्ह्यात विविध अवैध व्यवसायांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये गुटखा: १२ गुन्हे, ७७.६५ लाख रुपये मुद्देमाल, १७ आरोपी. मटका/जुगार: ११४ गुन्हे, ५२.९९ लाख रुपये मुद्देमाल, ३६० आरोपी. दारूबंदी: ३२६ गुन्हे, ३०.८३ लाख रुपये मुद्देमाल, ३४५ आरोपी. शस्त्र अधिनियम: ५९ गुन्हे, ५९.४९ लाख रुपये मुद्देमाल, ८० आरोपी. इतर गुन्हे: ६१ गुन्हे, ११.१५ कोटी रुपये मुद्देमाल, १४१ आरोपीचा समावेश आहे. परभणी जिल्हा: परभणी जिल्ह्यातही पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये गुटखा: ९ गुन्हे, ११.१२ लाख रुपये मुद्देमाल, १५ आरोपी. मटका/जुगार: ६६ गुन्हे, १८.५७ लाख रुपये मुद्देमाल, १२१ आरोपी. दारूबंदी: १२३ गुन्हे, १४.३३ लाख रुपये मुद्देमाल, १२७ आरोपी. शस्त्र अधिनियम: १२ गुन्हे, ३. १० लाख रुपये मुद्देमाल, १९ आरोपी. इतर गुन्हे: ५० गुन्हे, ५.३९ कोटी रुपये मुद्देमाल, १०६ आरोपी चा समावेश आहे. हिंगोली जिल्हा: हिंगोली पोलिसांनी दारू आणि इतर अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष कारवाई केली. यामध्ये गुटखा: ५ गुन्हे, १७.५१ लाख रुपये मुद्देमाल, ६ आरोपी. मटका/जुगार: ५३ गुन्हे, ३.१२ लाख रुपये मुद्देमाल, ७८ आरोपी. दारूबंदी: २०९ गुन्हे, ५, लाख रुपये मुद्देमाल, २११ आरोपी. शस्त्र अधिनियम: ६ गुन्हे, ७०,८०० रुपये मुद्देमाल, ७ आरोपी. इतर गुन्हे: ६४ गुन्हे, १.६८ कोटी रुपये मुद्देमाल, ७३ आरोपीचा समावेश आहे. लातूर जिल्हा: लातूर जिल्ह्यात जुगार आणि दारूबंदी कायद्यांतर्गत सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये गुटखा: ६ गुन्हे, १५ लाख रुपये मुद्देमाल, १० आरोपी. मटका/जुगार: ११७ गुन्हे, ५५.६८ लाख रुपये मुद्देमाल, २४२ आरोपी. दारूबंदी: ३३० गुन्हे, २५.५२ लाख रुपये मुद्देमाल, ३३१ आरोपी. शस्त्र अधिनियम: १० गुन्हे, ८,००० रुपये मुद्देमाल, १२ आरोपी. इतर गुन्हे: १०७ गुन्हे, २.८७ कोटी रुपये मुद्देमाल, १११ आरोपीचा समावेश आहे. जून महिन्यात ‘अंमली पदार्थ विरोधी’ मोहीम मे महिन्यातील यशस्वी कारवाईनंतर, १ जूनपासून संपूर्ण जून महिनाभर परिक्षेत्रात गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अंमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp