विदर्भात उष्णतेची लाट कायम: चंद्रपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन – Nagpur News

विदर्भात उष्णतेची लाट कायम:  चंद्रपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन – Nagpur News



राज्याच्या काही भागांत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम असल्याने नागरिक उन्हाच्या कडाक्याने प्रचंड हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच भीषण तापमानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने आज चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून, या धोक्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून, मागील आठवड्यापासून संपूर्ण जिल्हा उन्हाच्या तीव्र झळांनी अक्षरशः होरपळून निघत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज उष्णतेचा रेड अलर्ट, तर शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊन उकाड्याची हीच स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भीषण उष्णतेच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हात विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे महत्त्वपूर्ण आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाशिमला रेड अलर्ट वाशिम जिल्ह्यातही प्रचंड उकाडा जाणवत असून, गेल्या महिन्याभरापासून येथील तापमान सलग 40 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, या भीषण परिस्थितीची दखल घेत हवामान विभागाने आज वाशिमसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या वेळेत मुख्य रस्त्यांवरील वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ लक्षणीयरीत्या घटली असून, शहरात अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय लोक घराबाहेर पडणे टाळत असून, उष्माघाताचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना योग्य ती काळजी घेत सतर्क राहण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. शुक्रवारपासून विदर्भात तापमान काही अंशाने घटणार सध्या 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या घरात असलेले विदर्भातील तापमान शुक्रवारपासून 3 ते 5 अंशांनी घटून 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उद्यापासून विदर्भातील नागरिकांना या असह्य उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. याचबरोबर, तापमानातील या घटीसोबतच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची दाट शक्यता असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची लवकरच यातून सुटका होणार आहे. मान्सून लांबणार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे यंदा मान्सूनच्या आगमनाला काहीसा विलंब होत असल्याचे चित्र आहे. अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी सध्या त्याचा पुढील प्रवास रखडला असून, तो 1 जूनपर्यंत केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्यानंतरच त्याच्या पुढील वाटचालीची आणि पर्यायाने महाराष्ट्रातील त्याच्या आगमनाची नेमकी दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp