शाहू महाराजांचा मनोज जरांगेंना पाठींबा: म्हणाले – राज्य सरकार मराठा समाजाकडे असेच दुर्लक्ष करत राहिले तर उद्रेक अटळ – Maharashtra News

शाहू महाराजांचा मनोज जरांगेंना पाठींबा:  म्हणाले – राज्य सरकार मराठा समाजाकडे असेच दुर्लक्ष करत राहिले तर उद्रेक अटळ – Maharashtra News

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. पण सरकार मर

.

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचलेत. पण जरांगे आपल्या आंदोलनापासून तसूभरही मागे हटले नाहीत. या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना राज्य सरकारने सातारा गॅझेटसह कोल्हापूर गॅझेटचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी या प्रकरणी सरकारला केली आहे.

मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले तर उद्रेक होईल

शाहू महाराज पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा उद्रेक होऊ शकतो. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांची भूमिका आक्रमकच असली पाहिजे. ते उन्हात बसलेत. आम्हीही उन्हात बसलोत. शेतकरी म्हटले की त्याला ऊन, पाऊस, वाऱ्याचा काहीही फरक पडत नाही. आता वाटाघाटीत काय निघते ते पाहू. त्यातून कळेल सरकार सीरियस आहे की नाही. जरांगे 8 वर्षांपासून आंदोलन करत आहेत. वाटाघाटी होत आहेत. पण काही ठरत नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. त्यांना आतापर्यंत काहीच मिळाले नाही.

जरांगे पाटील व सरकारमध्ये काय ठरत आहे किंवा काय घडत आहे हे आम्हाला माहिती नाही. या प्रकरणी वर्तमानपत्रात जे छापून येते, त्यातूनच माहिती मिळते. पण प्रत्यक्षात काय ठरतंय, कुठे घसरतंय, कुठे जमत नाही हे आम्हाला कोल्हापुरात कळत नाही. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा सुरुवातीपासूनच पाठींबा आहे. मराठा समाज यासंबंधी नेहमीच एकसंध राहील.

कोल्हापूर गॅझेट लागू करण्यावरही विचार व्हावा

शाहू महाराज म्हणाले, शासनाने या प्रकरणी कोल्हापूर गॅझेटचा विचार केला पाहिजे. त्या आधारावर आपला निर्णय घेतला पाहिजे. मनोज जरांगे ज्या भागात राहतात, तो भाग हैदराबाद संस्थानात होता. ते निजामाचे स्थान आहे. त्यामुळे जरांगेंना नैसर्गिकपणे तेथील आठवणे येते. इथली येत नाही. त्यांना कोल्हापूर गॅझेट लांबचे वाटते. हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते. मराठा व कुणबी समाज हा एकच आहे. पूर्वीच्या काळात लढाईच्या काळात जाणाऱ्यांना मराठे असे म्हटले जायचे. लढाईहून परत आल्यानंतर हेच मराठे शेती करायचे म्हणून त्यांना कुणबी म्हटले जायचे. त्यामुळे सर्व कुणबी मराठे आहेत, असे शाहू महाराज म्हणाले.

हे ही वाचा…

उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील एक मोठा वर्ग निराश झाला आहे. सरकारवरच नव्हे, तर या संपूर्ण प्रक्रियेवर.

आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी धगधगत आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहेत. आपले शरीर थकले असले तरी इरादा कायम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि इकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले आहे. आता चर्चा होईल, आश्वासन मिळेल, जरांगे माघारी जातील असे गृहीत धरले जात आहे. पण यात पुन्हा एक प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे यावेळी तरी काही वेगळे घडेल का? वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp