उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली: सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन – Jalgaon News

उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली:  सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन – Jalgaon News



उबाठाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्व जण पाहत आहोत, त्यांचा एकसुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असे वाटते की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही, मनपात जिंकता आले नाही तर तिथेही ते तसेच म्हणत आहेत, त्यांचा पराभव झाला की त्यांना वाटते की हे काही कामाचेच नाही, असे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मतदार उबाठाला स्वीकारायला तयार नाही. 17 पैकी 1 सुद्धा जागा त्यांची निवडून येणार नाही. म्हणून ते वायफळ बडबड करत आहे. उबाठाने राज्यसभेवर केवळ मोठमोठ्या लोकांनाच संधी दिली आहे, एकाही कार्यकर्त्यांना संधी दिली नाही, असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री आहेत. महायुतीबद्दल वक्तव्य करताना त्यांनी विचार केला पाहिजे. अर्ज मागे घेण्याचा वेळेपर्यंत बंडखोरी कसे काय म्हणता येईल. 17 ही जागांवर महायुतीमधील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत, पण नेत्यांनी सांगितल्यावर ते अर्ज माघारी घेण्यात आले आहेत किंवा 3 वाजेपर्यंत मागे घेतील. गोकुळ गिते सुद्धा नाशिकमधून उमेदवारी अर्ज मागे घेतील. अब्दुल सत्तार यांचा मुलगा माघार घेत आहे, गुलाबराव पाटील यांचा मुलगा माघार घेत आहेत. सर्वांनी सारखे वागले पाहिजे. कुठेही बंडखोरी कायम राहणार नाही. गिते माघार घेणार गिरीश महाजन म्हणाले की, नाशिक विधान परिषदेचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे गणेश गिते यांनी माघार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तर गोकुळ गिते हे निवडणूक लढवण्यासाठी थोडे आग्रही आहेत पण मी त्यांची समजूत काढली आहे. ते सुद्धा माघार घेतील. 17 जागांवर ज्या ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घेतील. महायुतीमध्ये एकमताने जागेचे वाटप दिले झाले आहे, कुठेही बंडखोरी होणार नाही. महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकमध्ये बंडखोरी केली असे अजून म्हणता येणार नाही. 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उरला प्रश्न अर्ज भरण्याचा तर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी जळगावात अर्ज भरला आहेच ना? कोणी कुठेही बंडखोरी केलेली नाही. 3 वाजेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. अब्दुल सत्तार यांचा मुलाने अर्ज दाखल केला आहे ते काय काय बोलत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे निवडणुकीकडे लक्ष आहे. गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांच्यशी माझे बोलणं झाले आहे. त्यांनी सांगितले की आमचे उमेदवार अर्ज मागे घेतील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp