
Public Holiday: 7 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील एकूण 12 जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, जिथे 13 पंचायत समित्यांसाठी मतदान घेतले जाईल. एकूण 73 गट आणि 146 गणांसाठी ही प्रक्रिया राबवली जाईल. हे निवडणुकीचे आयोजन ग्रामीण भागातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुट्ट्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केलीय. याबद्दल जाणून घेऊया.
मतदान प्रक्रिया कशी असेल?
मतदान केंद्रांवर सकाळी साडेसहा वाजता मॉक पोल सुरू होईल, ज्यामुळे प्रत्यक्ष मतदानाचा सराव होईल. यात मतदान यंत्रणांची तपासणी केली जाईल आणि कोणतीही तांत्रिक अडचण आली तर ती लगेच दूर केली जाणार आहे. सर्व मतदान यंत्रांचे वाटप पूर्ण झाले आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक साहित्य आणि कर्मचारी तैनात आहेत. हे सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मॉक पोलमुळे मतदारांना प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत असल्याचा विश्वास मिळणार आहे. यामुळे मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होणार नाही आणि लोक शांतपणे आपला हक्क बजावू शकतील, असेही ते म्हणाले.
दुबार मतदारांसाठी कडक नियम
जर एखादा मतदार दुबार मतदानासाठी (डबल मार्क) आला तर त्याला हमीपत्र द्यावे लागेल. त्याने आधी मतदान केलेले नाही, याची तो खात्री दईव, पण जर हे हमीपत्र खोटे आढळले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल. अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्याविरोधत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त
निवडणुकीदरम्यान शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पुणे जिल्ह्यात 8 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पोलिस प्रत्येक मतदान केंद्र, रस्ते आणि संवेदनशील भागांवर नजर ठेवतील. कोणत्याही प्रकारच्या गोंधळ किंवा हिंसाचाराला थारा मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत ज्यात गर्दी नियंत्रण, संशयास्पद व्यक्तींची तपासणी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे समाविष्ट आहे. यामुळे मतदार निर्भयपणे मतदान करू शकतील आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
मतमोजणी आणि निकाल प्रक्रिया
मतदान संपल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी मतमोजणी होणार आहे. यामुळे निकाल लवकर जाहीर होऊ शकतील आणि पारदर्शकता राहील.मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा आणि निरीक्षक असतील. हे प्रक्रिया जलद आणि अचूक करण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरली जाईल. यामुळे विजयी उमेदवारांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि पंचायत समित्यांची नवीन रचना लवकर तयार होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक सुट्टी जाहीर
मतदारांना सहज मतदान करता यावे यासाठी ग्रामीण भागात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मतदानाचे प्रमाण वाढेल आणि अधिक लोक सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. ही सुट्टी शहरी भागात लागू नाही, फक्त ग्रामीण क्षेत्रांसाठी आहे. अशा प्रकारे, निवडणूक आयोगाने मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



