अयाेध्या ते नेपाळ खळबळ: देणगी चाेरीने जनकपुरी व्यथित; 7 जणांचे पथक अयाेध्येकडे

अयाेध्या ते नेपाळ खळबळ:  देणगी चाेरीने जनकपुरी व्यथित; 7 जणांचे पथक अयाेध्येकडे

  • Marathi News
  • National
  • Excitement From Ayodhya To Nepal, Janakpuri Distressed By Donation Theft; 7 member Team Headed To Ayodhya

चंदन पांडेय | जनकपूर/वाराणसी4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीच्या घटनेमुळे एकीकडे सनातन धर्मीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे माता सीतेच्या माहेरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रभू श्रीराम यांचे सासर शेजारील नेपाळमधील जनकपूर येथे आहे. जानेवारी २०२४ मध्ये श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठावेळी माता सीतेच्या माहेरकडून त्यांच्या नव्या घरासाठी अनेक भेटवस्तू पाठवण्यात आल्या होत्या. त्या वेळी जानकी मंदिराचे महंत रोशन दास सुमारे ५०० जणांसह ३ ट्रक, ७ बस आणि ४० स्कॉर्पिओ वाहनांतून अयोध्येला पोहोचले होते.

महंत रोशन दास ‘भास्कर’शी बोलताना म्हणाले, भगवान श्रीराम यांच्या कोणत्याही मंदिरात अशी घटना ना कधी पाहिली, ना ऐकली. अयोध्येतील देणगी चोरीची माहिती मिळाल्यापासून मन व्यथित झाले आहे. रागही येत आहे. मनाला शांती नाही. चोरांनी आणखी काय-काय चोरले असेल, याचीही चिंता वाटते. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.”

महंत रोशन दास म्हणाले, अयोध्येत फोन करून तेथील परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, मनाला समाधान मिळत नसल्याने पुढील महिन्यात जनकपूरहून पाच ते सात जणांना अयोध्येला जावयाच्या घरी पाठवण्याची योजना आहे. भारतात जाऊन सांत्वन करून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन ते परततील, असे त्यांनी सांगितले. जनकपूरचे महापौर मनोज शाह यांनी सांगितले की, अयोध्येतील चोरीनंतर जानकी मंदिराचे महंत रोशन दास यांनी फोनवरून चौकशी केली. अयोध्येकडून भेटवस्तू संग्रहालयात सुरक्षित असल्याचे सांगितले.

ही सामग्री पाठवली होती

जानकी मंदिराचे महंत रोशन दास यांच्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष तयार केलेले दागिने व चांदीची भांडी आणण्यात आली होती. १,१०० डारल्यांतून फळे, पक्वान्ने, सुका मेवा, कपडे, सौभाग्याचे साहित्य तसेच जावयासाठी नवे कपडे पाठवले होते. प्रभू श्रीरामांसाठी चांदीच्या खडावा, ताट, वाटी, पेला, लोटा, पान, सुपारी, बाण व धनुष्य देण्यात आले होते. तर माता सीतेसाठी सोन्याचे ३ हार, पैंजण, जोडवी, पूजेचे ताट, चांदीचे कडे, कंबरपट्टा, मंगळसूत्र, कर्णफुले, कानातले, मांगटीका, चांदीचा सिंदूर डबा व सौभाग्याचे संपूर्ण साहित्य पाठवण्यात आले होते.

२३ कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर केवळ १३ कर्मचारी उरले

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देणगी रकमेच्या मोजणी व्यवस्थेसमोर मोठे संकट आहे. वेतन आणि वाढलेल्या कामाच्या तासांबद्दल नाराज सुमारे २३ मोजणी कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता बँकेकडे १३ मोजणी कर्मचारी उरले असून देणगीची नियमित मोजणी प्रभावित होण्याची शक्यता आहे. मोजणी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी हे काम दोन शिफ्टमध्ये होत होते आणि प्रत्येक कर्मचारी सुमारे सहा तास काम करत होता. आता व्यवस्था बदलून सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी एकाच शिफ्टची केली. हे सर्व कर्मचारी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत हे काम करत होते.

देणगीत १०-२०च्या नोटा वाढल्या, ५०० च्या घटल्या

मोजणी कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी देणगीत ५०० रुपयांच्या नोटांची ७० ते ८० बंडले तयार होत असत. त्यामुळे मोजणी तुलनेने लवकर पूर्ण होत होती. आता परिस्थिती बदलली आहे. १० व २० रुपयांच्या नोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ५०० रुपयांच्या नोटांची अवघी सुमारे १५ बंडले तयार होत आहेत. लहान मूल्यांच्या नोटा जास्त असल्याने मोजणीस पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार श्रीराम मंदिर परिसरातील ५४ दानपेट्यांतून आलेली रक्कम सुमारे ६ पेट्यांमध्ये मोजणी केंद्रात आणतात.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp