प्रथमच बाबा बर्फानी पाचव्या दिवशीच अंतर्धान: 3 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला नाही, तापमान वाढीचा परिणाम; कधी 25 दिवसांपर्यंत दर्शन व्हायच

प्रथमच बाबा बर्फानी पाचव्या दिवशीच अंतर्धान:  3 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला नाही, तापमान वाढीचा परिणाम; कधी 25 दिवसांपर्यंत दर्शन व्हायच

  • Marathi News
  • National
  • For The First Time, Baba Barfani Entered The Temple On The Fifth Day Itself; 3 Lakh Devotees Did Not Get The Benefit Of Darshan, Due To The Increase In Temperature; Sometimes Darshan Was Possible For Up To 25 Days

मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर22 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली. बाबा बर्फानी पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जवळपास अंतर्धान (वितळणे) पावले. गेल्या वर्षी असे ७ व्या तर त्यापूर्वी १० व्या दिवशी झाले होते. म्हणजेच हिमलिंग वितळण्याचा वेग वाढत आहे. या वेळी ४ लाखांवर भाविकांनी नोंदणी केली. केवळ १ लाख जणांनी दर्शन घेतले आहे.

सूत्रांनुसार बोर्ड पुढच्या वर्षापासून यात्रेची सुरुवात २५ जूनच्या आसपास होईल. यामुळे हिमलिंग किमान १०-१५ दिवस टिकून राहील. या वर्षी बाबा बर्फानींचा पहिला फोटो २३ मे रोजी जारी केला. त्यात आकार ७ फूट उंच व अडीच फूट रुंद होता. २९ जूनला तो ५ फूट तर ३ जुलै रोजी यात्रेच्या पहिल्या दिवशी तो सुमारे साडेचार फूट होता.

प्रथमच बाबा बर्फानी पाचव्या दिवशीच अंतर्धान: 3 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला नाही, तापमान वाढीचा परिणाम; कधी 25 दिवसांपर्यंत दर्शन व्हायच

मानवी हस्तक्षेपामुळे वरची हवा उष्ण होतेय

जुलै आणि ऑगस्ट साधारणपणे खोऱ्यातील सर्वात उष्ण महिने असतात. तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांपर्यंत जास्त असते. त्यामुळे हिमनद्या वितळू लागतात. हे सामान्य आहे, पण पूर्वी हिमलिंग यात्रा सुरू झाल्यानंतर २०-२५ दिवसांपर्यंत टिकून राहायचे, मात्र गेल्या तीन वर्षांपासून परिस्थिती वेगाने बदलली आहे. याचे मोठे कारण डोंगरांवरील वाढता मानवी हस्तक्षेप असू शकते. बालटालच्या मार्गे आता गुहेपर्यंत गाड्या जात आहेत. यात्रा सुरू होण्याच्या एक महिना आधीपासून लोक गुहेत पोहोचू लागतात. यामध्ये लंगर, घोडेवाले जास्त असतात.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp