
मुलांना बालवयात 3 भाषा शिकायला लावणे हा त्यांच्यावरील अत्याचार आहे, असे स्पष्ट मत महायुती सरकारने त्रिभाषा वादावर नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुती सरकारने मराठी विरुद्ध हिंदी व
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येणार होती. पण या प्रकरणी मनसे व ठाकरे गटाने कडाडून विरोध केल्यानंतर सरकारहा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर सरकारने यासंबंधी अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वातील एक समिती नियुक्त केली. ही समिती केंद्राचे शालेय शिक्षण धोरण राज्यात कसे लागू करणार? कोणत्या भाषा शिकवण्याची गरज आहे? आदी बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. त्यानंतर सरकार त्रिभाषा सूत्राचा अंतिम निर्णय घेणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी ‘एबीपी माझा’शी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.
कोवळ्या वयात 3 भाषा शिकायला लावणे हा अत्याचार
नरेंद्र जाधव म्हणाले, त्रिभाषा व हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद सुरू असताना दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत आम्ही कुठेही कोणत्याही भाषेची सक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य नाही. ही टिप्पणी फार महत्त्वाची आहे. कारण, लोकांनी ग्रहित धरले होते की, आता 3 भाषा शिकवल्या जाणार. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली जाणार. यामुळे वाद झाला. विशेष म्हणजे यापूर्वी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वातील समितीच्या अहवालाशी सुसंगत अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती.
तेव्हा सर्वांना वाटले होते की, माझ्या नेतृत्वातील समिती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीच्या अभ्यासावर शिक्कामोर्तब करेल. त्यानंतर तीन भाषा शिकण्याची सक्ती केली जाईल. पण तसे होणार नव्हते. कारण, मुलांना कोवळ्या वयात तीन भाषा शिकायला लावणे हा त्यांच्यावरील अत्याचार आहे. ते खेळताना किंवा संभाषणातून भाषा शिकू शकतात. पण त्यांना पुस्त व वही देऊन अभ्यास करायला लावला किवा लिहायला लावले तर त्यांची पंचाईत होते. कारण, प्रत्येक भाषेचे व्याकरण वेगळे असते. त्यातून त्यांचा गोंधळ उडतो व ते धेडगुजरी भाषा बोलू लागतात.
समितीच्या सदस्यांची नावे लवकरच घोषित होणार
ते पुढे म्हणाले, इयत्ता पहिलीपासून 2 भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला तर मुख्य गोष्टी सोडून इतर विषयांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या घोकमपट्टीवर भर दिला जातो. हे टाळणे गरजेचे होते. माझ्या समितीच्या अहवालात ते पुढे आलेच असते. पण सुदैवाने केंद्र सरकारने ही गोष्ट अगोदरच स्पष्ट केली.
नरेंद्र जाधव यांनी यावेळी आपल्या नेतृत्वातील समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा लवकरच होणार असल्याचेही स्पष्ट केले. मी सरकार, शिक्षण विभाग व विविध विद्यापीठांकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार त्रिभाषा सूत्र व शैक्षणिक धोरणावरील अभ्यास सुरू झाला आहे. आमच्या समितीमधील सदस्यही ठरलेत. पण त्यांच्या नावांची घोषणा अजून झाली नाही. चालू आठवड्याच्या अखेरीस या सदस्यांच्या नावांची घोषणा होईल, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.