देणगी चोरी: अयोध्या राम मंदिर ट्रस्टचा पूर्ण आराखडा बदलण्याची तयारी, महंतांसोबत मंथन, चंपत राय यांना भेटले गोविंद देव, दीड तास चर्चा

देणगी चोरी:  अयोध्या राम मंदिर ट्रस्टचा पूर्ण आराखडा बदलण्याची तयारी, महंतांसोबत मंथन, चंपत राय यांना भेटले गोविंद देव, दीड तास चर्चा

  • Marathi News
  • National
  • Preparations To Change The Complete Plan Of Ayodhya Ram Temple Trust, Brainstorming With Mahants, Govind Dev Met Champat Rai, Discussed For One And A Half Hours

अयोध्या18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा संपूर्ण आराखडा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. तो कसा असावा, मंदिर व्यवस्थापन कसे केले जावे, व्यवस्थेत कोणते व्यापक बदल घडवून आणावेत, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. यासाठी ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांना सक्रिय करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी यासंदर्भात अनेक बैठका घेतल्या. ते देणगी चोरी प्रकरणानंतर वादात अडकलेले ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांनाही मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र भवनात भेटले. ही भेट दीड तास चालली.

यानंतर गोविंद देव यांनी वैदेही भवनमध्ये अयोध्येतील काही प्रतिष्ठित महंतांसोबत बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत महंतांनी ट्रस्टचा संपूर्ण आराखडा बदलण्याचा मुद्दा मांडला. यावर गोविंद देव म्हणाले- ट्रस्टमध्ये लवकरच मोठा बदल होईल, जो दिसेलही. बैठकीनंतर राधावल्लभ मठाचे महंत स्वामी रामगोपाल दास यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, आमची इच्छा आहे की येथील संत महात्म्यांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व मिळावे.

नवा खुलासा : बनावट पावती पुस्तकाद्वारेही आरोपींनी उकळली देणगी, भाविकांची फसवणूक

देणगी चोरी प्रकरणातील पोलिस तपासात आणखी एक खुलासा झाला आहे. एसआयटीने अटक केलेल्या ८ आरोपींच्या माहितीवरून तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने छापलेली जुनी बनावट देणगी पावती पुस्तके जप्त केली आहेत. आरोपींनी कबूल केले आहे की ते केवळ दान रकमेचीच चोरी करत नव्हते, तर बनावट पावत्या फाडून भाविकांकडूनही पैसे उकळत होते. या पावत्या हुबेहूब खऱ्या पावत्यांची कॉपी होत्या. यावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे नावही होते. जेव्हा मंदिरात ऑनलाइन पावती आणि अधिकृत दान व्यवस्था लागू करण्यात आली त्यानंतर आरोपींनी कागदी बनावट पावत्यांचा वापर बंद केला. यानंतर भाविक थेट मंदिराच्या बँक खात्यात देणगी पाठवू लागले.

योगी म्हणाले- काहींच्या चुकीमुळे संपूर्ण ट्रस्टला बदनाम करू नका : दरम्यान, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ६ कर्मचारी चोरी करत होते. दोन मदतनीस होते. काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या चुकांसाठी संपूर्ण राम मंदिर ट्रस्टला बदनाम करणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तो पारदर्शक पद्धतीने होईल व दोषींवर कारवाईदेखील केली जाईल.

बद्रीनाथ धाम : देणगी चोरीच्या चौकशीसाठी नवी समिती

चमोली | बद्रीनाथ धाममध्ये दान आणि देणगीतील कथित चोरी व गैरव्यवहारानंतर आता उत्तराखंड सरकारने ३ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती १५ दिवसांत चौकशी अहवाल देईल. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी म्हटले आहे की, हा गुन्हा माता-पित्याच्या हत्येसमान आहे. यातील दोषींसह कोणालाही सोडणार नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp