सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने घेतला मोठा ब्रेक: 25 जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय, 4-5 दिवसांत पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज

सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने घेतला मोठा ब्रेक:  25 जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय, 4-5 दिवसांत पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज

  • Marathi News
  • National
  • For The Third Consecutive Year, The Monsoon Took A Big Break In June, Monsoon Became Active In Maharashtra After June 25, It Is Expected To Advance In 4 5 Days

नवी दिल्ली18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मान्सूनच्या पश्चिम शाखेची प्रगती ८ जूनपासून जवळपास अडकलेली आहे. सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने मोठा ब्रेक घेतला आहे. मात्र, २०२४ आणि २०२५ मध्ये मान्सूनच्या सुरुवातीच्या ब्रेकनंतरही सामान्यपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती.

हवामान विभागानुसार, येत्या ४-५ दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, मंगळवारी २३ जूनपासून वातावरणात बदल होऊ शकतो. नंतर गुरुवारी २५ जून ते बुधवारी १ जुलै या काळात मुंबई, कोकणात मान्सून सक्रिय होईल. सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पूर्व मराठवाड्यातही याच काळात मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.

सलग तिसऱ्या वर्षी जूनमध्ये मान्सूनने घेतला मोठा ब्रेक: 25 जूननंतर मान्सून महाराष्ट्रात सक्रिय, 4-5 दिवसांत पुढे सरकण्याची स्थिती निर्माण हाेण्याचा अंदाज

उकाड्याने हैराण, पेरणीसाठी प्रतीक्षा…

१९ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २९ जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार असून, दरम्यान, कोकणात दमट हवामानामुळे रात्रीचा उकाडा वाढणार आहे. ‘एल निनो’ च्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये बळकटीची कमतरता असल्याने, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असाही सल्ला खुळे यांनी दिला आहे.

  • डेटा उपलब्ध नाही पाऊस नाही असूचिबद्ध पावसाची अति तूट पाऊस तूट सरासरी जास्त सर्वात जास्त

अमेरिकन नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए) च्या उपग्रह रिपोर्ट‌्सनुसार इंटरट्रॉपिकल कन््हर्जन्स झोन पुरेशा वेगाने सक्रिय न झाल्यामुळे मान्सूनचा वेग संथ आहे. हा साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत उत्तरेकडे सरकून भारतात आर्द्रता खेचतो. एल निनोची परिस्थितीही विकसित होत आहे. याचा परिणाम म्हणून मोठा कोरडा कालावधी, असमान पाऊस दिसू शकतो. उपग्रहाची आकडेवारी पूर्व भारतात सक्रिय मेघगर्जना विजांचा संकेत देते. पण मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम भारतात ढगांची घनता कमी आहे.

37.8% पाऊस जूनमध्ये आतापर्यंत कमी झाला

१७ जूनपर्यंत देशात ४६.२ मिमी पाऊस झाला आहे, तर सामान्य पाऊस ७४.३ मिमी असतो. म्हणजेच ३७.८% पावसाची तूट नोंदवली गेली. बुधवारी देशाचा मोठा भाग पावसाच्या दृष्टीने ‘नो वॉर्निंग’ श्रेणीत होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp