digital products downloads

अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा: पवार कुटुंब एकत्र येणार; सुप्रिया म्हणाल्या – मला वहिनींचा फोन आला, बाकीच्यांचे माहिती नाही! – Mumbai News

अजित पवारांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा:  पवार कुटुंब एकत्र येणार; सुप्रिया म्हणाल्या – मला वहिनींचा फोन आला, बाकीच्यांचे माहिती नाही! – Mumbai News


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा ठरला आहे. या साखरपुड्याचे निमंत्रण शरद पवार व सुप्रिया सुळे यांना मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच सर्व पवार कुटुंब मनात

.

अजित पवारांनी 2023 मध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. यामुळे पवार कुटुंबात राजकीय मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर काही कार्यक्रमांत शरद व अजित पवार एकत्र आले. पण त्यांच्यातील अबोला कायम राहिला. एवढेच नाही तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर प्रचंड चिखलफेक केली. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंब आता जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने एका मांडवाखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जय पवार यांच्या आत्या तथा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याविषयी बोलताना आपल्याला सुनेत्रा पवार यांच्याकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याची पुष्टी केली आहे.

सुनेत्रा पवारांनी केला सुप्रिया सुळेंना फोन

मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण मिळाले आहे. अर्थातच आमंत्रण मिळाल्यामुळे मी जाणार. सदानंद सुळे, सुप्रिया सुळे व रेवती सुळे आदी सर्वजण जाणार. बाकीच्यांचे मला माहिती नाही, असे सुप्रिया सुळे याविषयी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांचे नाव घेतले नाही. त्यामुळे ते या कार्यक्रमाला जाणार किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही. पण घरचे कार्य तथा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळे शरद पवार जय यांच्या साखरपुड्याला निश्चितच जातील असे सांगितले जात आहे.

आता पाहू कोण होणार अजित पवारांची सून?

उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना पार्थ व जय ही दोन मुले आहेत. जय पवार हे त्यांचे धाकटे चिरंजीव आहेत. त्यांचे ऋतुजा पाटील हिच्याशी लग्न ठरले आहे. ऋतुजा या साताऱ्याच्या फलटनच्या आहेत. प्रवीण पाटील असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. ते सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा उच्चशिक्षित असून, त्यांची व जय पवार यांची गत अनेक वर्षांपासून मैत्री असल्याची माहिती आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सूनबाई आहेत.

जय पवारांचा उद्योग व्यवसायाकडे कल

जय पवार यांचा राजकारणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. त्यांनी दुबईत काही वर्षे व्यवसाय केला. सध्या ते मुंबई व बारामती येथील आपला व्यवसाय पाहत आहेत. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते.

जय यांचे मोठे बंधू पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे. आत जय पवारही गत काही महिन्यांपासून बारामतीत तळ ठोकून आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार व त्यानंतर विधानसभा निवडणुकीत वडील अजित पवार यांचा प्रचार केला. त्यांच्या लग्नामुळे आता राजकीय वितुष्ट आलेले पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp