इथेनॉलने पेट्रोल गाड्यांचे नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाही- केंद्र: पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे निकाल पुढच्या वर्षापर्यंत येतील

इथेनॉलने पेट्रोल गाड्यांचे नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाही- केंद्र:  पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे निकाल पुढच्या वर्षापर्यंत येतील

  • Marathi News
  • National
  • There Is No Evidence That Ethanol Harms Petrol Cars Centre, Results Of Blending 20% Ethanol In Petrol Will Be Out By Next Year

नवी दिल्ली8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे की, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल (E20) मिसळण्याचे काम सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. या व्यवस्थेचा देश आणि वाहनांवर काय परिणाम होत आहे, याचे मूल्यांकन केले जात आहे. याचे निकाल पुढच्या वर्षापर्यंत स्पष्ट होतील. हे तथ्य अशा वेळी समोर आले जेव्हा जुन्या गाडी मालकांना चिंता आहे की E20 पेट्रोलने वाहनांचे परफॉर्मन्स बिघडू होऊ शकते.

कोर्टात सरकारी बाजू मांडताना ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी म्हणाले, E20 पेट्रोलमुळे इंजिन किंवा गाडीच्या पार्ट‌्सचे नुकसान झाल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. याचा उद्देश कच्च्या तेलाची आयात कमी करणे, प्रदूषण कमी करणे व इथेनॉल बनवणाऱ्या शेतकरी व कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. ॲटर्नी जनरलचा हा युक्तिवाद कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाविरोधात दाखल याचिकांवरील सुनावणीदरम्यान आला. हायकोर्टाने सरकारी तेल कंपन्यांना एका खासगी इथेनॉल फॅक्टरीचा कोटा वाढवण्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. या आदेशाविरोधात कंपन्या सुप्रीम कोर्टात गेल्या. त्यांचा युक्तिवाद आहे की इथेनॉल पुरवठ्याचे सर्व करार ऑक्टोबर २०२५ मध्येच झालेत. मध्येच कुणासाठी नियम बदलल्यास सिस्टीम बिघडेल. सुप्रीम कोर्टाने ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला.

इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर १ 402 कोटी लिटर : महाराष्ट्राची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता 144 इथेनॉल प्रकल्प राज्यात कार्यरत (मळीवर आधारित) 316 कोटी लिटर उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीची क्षमता.

E20 पेट्रोलचा वापर केल्याने गाडीच्या विमा पॉलिसीवरही कोणताच परिणाम होत नाही

१. माझ्या गाडीसाठी E20 पेट्रोल सुरक्षित आहे का? गाडी यास अनुकूल आहे हे कसे तपासावे? एप्रिल २०२३ नंतर बनलेल्या जवळपास सर्व नव्या कार आणि टू-व्हीलर्स E20 इंधनासाठी पूर्णपणे अनुकूल आहेत. हे गाडीच्या फ्युएल टँकच्या झाकणावर किंवा युझर मॅन्युअलवर पाहू शकता, तिथे ‘E20’ चे स्टिकर किंवा मार्किंग असेल. २०२३ पूर्वीच्या वाहनांचे इंजिन यासाठी डिझाइन केलेले नव्हते.

२. E20 पेट्रोल वापरल्याने गाडीचा इन्शुरन्स क्लेम फेटाळू किंवा अमान्य होऊ शकतो का? नाही, ही अफवा आहे. सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की देशभरात मिळणारे E20 पेट्रोल वैध आहे. याच्या वापराने गाडीच्या इन्शुरन्स पॉलिसीवर कोणताही परिणाम होत नाही.

३. सोशल मीडियात दावे आहेत की इथेनॉल पेट्रोलमुळे टाकीजवळ मुंग्या येत आहेत? हा दावा पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे. इंधन ग्रेड इथेनॉल तयार करण्यासाठी डिस्टिलेशन आणि फर्मेंटेशनची एक प्रदीर्घ वैज्ञानिक प्रक्रिया अवलंबली जाते, ज्यामुळे यातील उरलेली साखर पूर्णपणे नष्ट होते. यामध्ये असे केमिकल्स मिसळले जातात जे कीटकांना दूर पळवतात, त्यामुळे मुंग्या लागण्याची बाब केवळ अफवा आहे. 6625 कोटी रुपये गेल्या वर्षी इथेनॉल विक्रीतून राज्यातील साखर उद्योगाला मिळालेले उत्पन्न. 50 कोटी लिटर : धान्यापासून इथेनॉल निर्मितीची क्षमता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp