बालगुन्हेगार ठरवण्याचे वय घटवून 16वर्षे करण्यासाठी राज्य केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार: 75% बालगुन्हेगार 16 ते 18 वयोगटातील, 5 वर्षांत 21 हजारांहून अधिक बालगुन्हे – Mumbai News

बालगुन्हेगार ठरवण्याचे वय घटवून 16वर्षे करण्यासाठी राज्य केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार:  75% बालगुन्हेगार 16 ते 18 वयोगटातील, 5 वर्षांत 21 हजारांहून अधिक बालगुन्हे – Mumbai News

राज्यात वेगाने वाढणाऱ्या बालगुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. बालगुन्हेगारांची सध्याची १८ वर्षांची वयोमर्यादा घटवून ती

.

जालना आणि लातूरमधील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत आमदार अर्जुन खोतकर, सुधीर मुनगंटीवार व इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते.

गंभीर गुन्ह्यांत १६ वर्षांवरील मुले ‘सज्ञान’ धरणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बालसुधार गृहाच्या कायदेशीर शिथिलतेचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या बालकांचा वापर अमली पदार्थांची तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांसाठी करत आहेत. हे चक्र आता मोडून काढले जाईल. खून, बलात्कारासारख्या निर्घृण आणि अतिशय गंभीर प्रकरणांमध्ये १६ वर्षांवरील मुलांना ‘सज्ञान’ (प्रौढ) समजूनच खटला चालवला जावा, यासाठी राज्य सरकार न्यायालयातही दाद मागेल.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अभ्यासासाठी ‘उच्चस्तरीय समिती’

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कमी वयातील मुलांकडून होणाऱ्या क्रूर गुन्ह्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बालगुन्हेगारीच्या या वाढत्या भीषण प्रवृत्तीचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीच्या अहवालानुसार राज्य स्तरावर धोरणात्मक बदल केले जातील. दरम्यान, संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, शाळा-कॉलेजांमध्ये समुपदेशन व नशामुक्ती मोहीम राबवली जात असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp