भीमराव कांबळे आता फासावर चढा!: न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर चिमुरडी अत्याचारप्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय घडलं – Pune News

भीमराव कांबळे आता फासावर चढा!:  न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर चिमुरडी अत्याचारप्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय घडलं – Pune News



पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला आज (29 जून) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी राज्याला हादरवून सोडणाऱ्या प्रकरणात हा ऐतिहासिक निकाल दिला. हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने चाललेला खटला ठरला असून, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याच्या सुनावणीच्या १६ दिवसांत हा निकाल लागला आहे. कोर्टरूम लाईव्ह: निकालाच्या वेळी नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारी न्यायाधीशांची निरीक्षणे: निकाल देताना न्यायाधीशांनी आरोपीच्या क्रूरतेवर अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. कोर्टाने नोंदवलेली मुख्य निरीक्षणे… हत्येनंतरही अत्याचार, फाशीची शिक्षाही अपुरीच “आरोपीचे कृत्य इतके अमानुष आहे की त्याने चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही. पोस्टमार्टम अहवालानुसार, हत्येनंतरही त्याने तिच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्यासोबत ओरल सेक्स करण्याचा प्रयत्न केला. अशा नराधमाला फाशीची शिक्षा देखील अपुरीच आहे.” क्रूरतेचा कळस “पीडितेच्या अंगावर तब्बल १८ जखमा होत्या. तिचा श्वास कोंडण्यासाठी तिची पँट तिच्या तोंडात चक्क २१ सेंटीमीटर आत कोंबण्यात आली होती. असहाय्य मुलीने या दरम्यान अतोनात वेदना सहन केल्या.” दुर्मिळातील दुर्मिळ घटना (Rarest of Rare): “हे प्रकरण ‘रिअरेस्ट ऑफ रेअर’ श्रेणीत मोडते. शांत डोक्याने कट रचून केलेली हत्या आणि गुन्ह्याची गंभीरता फाशीच्या शिक्षेसाठी पूर्णपणे पात्र आहे.” कायद्याचे आणि जुन्या खटल्यांचे दाखले: न्यायाधीशांनी निकाल देताना ‘निर्भया प्रकरण’, ‘बशर अली केस’, ‘शंकर खाडे केस’ आणि ‘बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब’ या प्रकरणांचे दाखले दिले. सुधारण्याची पातळी ओलांडली; गुन्हेगारी इतिहास उघड “आरोपीचे वय ६५ असले तरी त्याला माफी देण्यालायक काहीही नाही. याआधी ५३ वर्षांचा असताना त्याने कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. एका वृद्धेवर त्याने हल्ला केला होता आणि आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही आणि त्याने सुधारण्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. निकालानंतरची आरोपीची अवस्था न्यायालयाने अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर नराधम भीमराव कांबळे सुन्न उभा होता, त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, हा निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर संतापलेल्या जनतेने मुंबई-बंगळूर महामार्ग रोखून धरला होता, अखेर या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना आणि समाजाला मोठा न्याय मिळाला आहे. ‘तो’ काळा दिवस: 1 मे रोजी नेमकं काय घडलं? महाराष्ट्र दिनी (1 मे) संपूर्ण राज्यात सुटी असताना नसरापूरमध्ये एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. साडेतीन वर्षांची एक निष्पाप चिमुरडी खेळत असताना 65 वर्षीय भीमराव कांबळे याने तिला फूस लावून नेले. स्वतःच्या विकृत वासनेपायी त्याने या बालिकेवर अमानुष अत्याचार केले आणि त्यानंतर अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली. या घटनेने केवळ पुणे जिल्हाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. जनक्षोभ आणि हायवे रोको: “आरोपीला आमच्या हवाली करा!” या घटनेची माहिती मिळताच नसरापूर आणि भोर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. कायदा आणि सुव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. संतप्त जमावाने थेट मुंबई-बंगळूर महामार्ग (हायवे) रोखून धरला. “आरोपीला आमच्या हवाली करा, आम्हीच त्याला शिक्षा देतो” अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली होती. समाजाचा हा संताप या गुन्ह्याची भीषणता दर्शवणारा होता. पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कामगिरी: 15 दिवसांत 1200 पानांचे आरोपपत्र जनतेचा संताप आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली: विशेष तपास पथक (SIT): पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने ‘विशेष तपास पथक’ स्थापन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. भक्कम पुराव्यांची साखळी: पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यक (Forensic) अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी यांची अचूक सांगड घातली. 16 दिवसांत आरोपपत्र: गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 15 ते 16 दिवसांत पोलिसांनी तब्बल १२०० पानांचे भक्कम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात 55 साक्षीदारांचे जबाब जोडण्यात आले होते. हा राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद तपासांपैकी एक ठरला. पोलीस आणि तपास यंत्रणांचे तोंडभरून कौतुक या जलदगती निकालासाठी न्यायालयाने तपास यंत्रणांची पाठ थोपटली. “१५ दिवसांत १२०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. उन्हाळ्याच्या सुट्टीतही कोर्टाने या खटल्याला पूर्ण वेळ दिला. ५५ साक्षीदार तपासले गेले. डॉक्टर, सायबर तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमने वाखाणण्याजोगी कामगिरी केली. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केल्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. अनेक प्रकरणांत न्याय मिळण्यास दिरंगाई होते, पण या प्रकरणात टीम वर्क आणि विशेष सरकारी वकिलांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या १६ दिवसांत खटला पूर्ण झाला. हे सर्वांसाठी एक उदाहरण आहे.”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp