
वरूड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी २५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. सत्तेसाठी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला तो भीषण काळ देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणीबाणीच्या काळातील क्रूरता, वृत्तपत्रांवरील सेन्सॉरशिप आणि लोकशाही रक्षकांच्या संघर्षावर आधारित विशेष प्रदर्शनी होती. उपस्थितांनी या प्रदर्शनीला गंभीरतेने पाहिले. भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रो. डॉ. सुमित पवार, आणीबाणीचे अमरावती ग्रामीणचे संयोजक राजेश्वर निस्ताने, वरूड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ईश्वर सलामे, शेंदुरजनाघाट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णाताई वरखडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
